Uddhav Thackeray, Jalana Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT : ठाकरेंच्या नेत्याची सटकली; शेतकऱ्याला लोखंडी रॉड चुलीत तापवून चटके, लाथा-बुक्यांनी मारहाण

Jalana News : जुन्या वादातून शेतकऱ्याला लोखंडी रॉडचे चटके देत लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली आहे. या जीवघेण्या मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.

Hrishikesh Nalagune

Jalana News : जुन्या वादातून शेतकऱ्याला लोखंडी रॉडचे चटके देत लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली आहे. या जीवघेण्या मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख नवनाथ सुदाम दौड आणि त्यांचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुदाम दौड या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, कैलास गोविंदा बोराडे (वय 35) हे बुधवारी (26 फेब्रुवारी) जानेफळ गायकवाड रस्त्यावरील वटेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी तिथे जुन्या वादाच्या कारणावरून माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विद्यमान तालुकाध्यक्ष नवनाथ सुदाम दौड व त्यांचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुदाम दौड या दोघांनी कैलास यांना अडवले.

दोघांनीही कैलास यांच्याशी वाद घातला. या वादातूनच चुलीत लोखंडी रॉड गरम करून अंगाला, पायाला, मानेवर, हातांच्या तळव्यावर आणि गुप्तांगावर चटके देऊन गंभीर जखमी केले. शिवाय लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी पारध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पण दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत. सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने अधिक तपास करीत आहेत.

रावसाहेब दानवेंचे कट्टर विरोधक :

नवनाथ दौड हे विधानसभा निवडणुकीदरम्यान, वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत आले होते. भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे ते कट्टर विरोधक म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. दानवेंच्या जिल्हा परिषद सदस्य मुलीवर दौड यांनी वादग्रस्त टीका केली होती. त्यांच्याविरुद्ध भाजपने आंदोलन केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT