BJP and Shiv Sena 1 Sarkarnama
मराठवाडा

BJP and Shiv Sena : बाळासाहेबांच्या अटकेचा आदेश..; ठाकरेंच्या शिलेदारानं जखमेवरची खपली काढली, भुजबळांवरून भाजप अन् शिंदे शिवसेनेला डिवचलं

Ambadas Danve Criticizes BJP and Shinde Shiv Sena Over Chhagan Bhujbal at Parbhani Meeting : शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परभणी इथं शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

Pradeep Pendhare

Maharashtra politics news : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळाच्या समावेशावरून महायुतीला डिवचलं आहे.

भाजपने भुजबळांविषयी केलेलं विधान, आणि हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना अटकेचा काढलेल्या आदेशाची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला करून दिली आहे. अंबादास दानवे यांनी एका जुन्या जखमेवरील खपली काढून, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांना चांगलाच सुनावलं आहे.

अंबादास दानवे (Ambadas Danve) परभणी दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना दिल्या. 'स्थानिक'च्या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेकडून प्रत्येक कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला बळ दिलं जाईल, असं आश्वासन दिलं. कोणत्याही प्रकारची कुठेही तडजोड न करता, स्वाभिमानानं, मराठी माणसांसाठी निवडणुकीला समोरे जा, असं सांगितलं.

या बैठकीत, अंबादास दानवे यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावरून भाजप सुनावलं, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचलं. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही, असं म्हणणारे एकनाथ शिंदे आणि 40 गद्दार आता छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का? याचे उत्तर देणार का? असा सवाल दानवेंनी केला.

विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यावेळी, आमदारांचे वास्तव्य असलेल्या शासकीय विश्रामगृहात समिती प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या सचिवाच्या कक्षात 1 कोटी 84 लाख सापडल्याने खळबळ उडाली. अमरावती वन अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी पैसे मागण्याच्या कथित ऑडिओ क्लिपवर बोलताना अंबादास दानवे यांनी या मंडळींनी धंदा मांडल्याची टीका केली.

महायुती मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा समावेश करण्यावरून दानवे यांनी भाजपला टोला लगावला. 'भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. काही काळ तुरुंगात देखील होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ हे महात्मा नाहीत, तर आरोपी असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री फडणवीस हे विसरले असतील', असा टोला लगावला. तसंच निधी वाटपामध्ये मुख्यमंत्र्यांनी दुजाभाव करू नये, असेही दानवे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT