Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate : कोकाटे भाजपातून राष्ट्रवादीत आले, भुजबळांच्या पाठिशी उभे राहिले... पण आता शत्रू का?

Chhagan Bhujbal and Manikrao Kokate political conflict resurfaces in Nashik : सुहास कांदे विरुद्ध छगन भुजबळ हा वाद संपूर्ण राज्याने आजवर पाहिला व अनुभवला आहे. मात्र आता माणिकराव कोकाटे विरुद्ध छगन भुजबळ हा नवा वाद जिल्ह्यात पाहायला मिळतो आहे. खरंतर या दोघांच्याही वादाला जुनीच किनार आहे.
Chhagan-Bhujbal-manikrao-Kokate
Chhagan-Bhujbal-manikrao-KokateSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate : सुहास कांदे विरुद्ध छगन भुजबळ हा वाद संपूर्ण राज्याने आजवर पाहिला व अनुभवला आहे. मात्र आता माणिकराव कोकाटे विरुद्ध छगन भुजबळ हा नवा वाद जिल्ह्यात पाहायला मिळतो आहे. खरंतर या दोघांच्याही वादाला जुनीच किनार आहे. परंतु अजित पवार यांनी भुजबळांना डावलून माणिकराव कोकाटे यांना मंत्री केल्यापासून हा वाद अधिकच चिघळला.

राष्ट्रवादीत आपल्याला मंत्रीपद हवे असेल तर छगन भुजबळ यांना डच्चू देणं महत्वाचं आहे. हे लक्षात घेऊन कोकाटे यांनी अजित पवार यांच्याशी जवळीक केली. भुजबळांना बाजूला सारत मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. त्यातूनच भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. भुजबळांच्या नाराजीवर त्याच स्टाईलने उत्तर देण्याचं काम कोकाटे यांनी केलं ते केवळ मंत्रिपदासाठी. तू मंत्री कि मी मंत्री असा हा वाद आहे. सत्तेचा लाभ हेच दोघांमधील वादाचे मुख्य कारण बनलं.

मोठा संघर्ष केल्यानंतर आता छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं आहे. तेही पक्षाच्या मनात नसतानाही भाजपशी जवळीक साधून भुजबळांनी राष्ट्रवादीतच राहून ही किमया करुन दाखवली आहे. मंत्री झाल्यानंतर भुजबळांनी राजकीय फटकेबाजी करताना अप्रत्यक्षपणे कोकाटे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. ज्यांना माझ्या बद्दल जास्तप्रेम होतं. त्यांनी मला मंत्रिपद मिळू नये यासाठी प्रयत्न केले. त्यातील काही लोक पक्षातील होते असं भुजबळांनी म्हटलं आहे. अर्थात कोकाटेंवरच भुजबळांचा रोख आहे.

Chhagan-Bhujbal-manikrao-Kokate
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांनी कृषिमंत्री कोकाटेंच्या वर्मावरच ठेवले बोट, म्हणाले, सतत घर बदलणाऱ्यांना...

शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे घर उभ करण्यात माझाही खारीचा वाटा आहे. आज एका घरात उद्या दुसऱ्या घरात. जे सतत नव्या घरात घरोबा करतात त्यांना आमचे दु:ख कळणार नाही या भाषेत भुजबळांनी मंत्री झाल्यानंतर कोकाटेंवर घाव घातला आहे. त्यामुळे दोघेही मंत्री झाले असले तरी दोघांच्या आतील शीत युद्ध आजूनही सुरुच असल्याचं दिसतं.

या दोघांमधील वादाला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचीही किनार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे छगन भुजबळ असा सामना झाला होता. या निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांना मदत केली नव्हती. तिथूनच खऱ्या अर्थाने दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात. कोकाटे यांनी आपल्याला लोकसभेला मदत केली नाही, म्हणून भुजबळांनी विधानसभेला त्याचा वचपा काढला.

Chhagan-Bhujbal-manikrao-Kokate
Nashik Politics : सात आमदार त्यातले तीन मंत्री, नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा वाढला; भाजपलाही टाकलं मागे

२०१४ च्या सिन्नर विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी माणिकराव कोकाटे यांना मदत केली नाही. भुजबळ यांनी कोकाटे यांचे विरोधी उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मदत केली होती. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा पराभव झाला होता. दरम्यानच्या काळात दोघांमधील हा वाद मिटलाही होता. दोघांमध्ये एकप्रकारे समजोता झाला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भुजबळांना मदत व्हावी म्हणून कोकाटे यांनी भाजप सोडून अपक्ष उमेदवारी केली होती. त्याची परतफेड म्हणून त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भुजबळांनी परत कोकाटे यांना मदत केली व कोकाटे आमदार झाले.

विधानसभा निवडणुकीत २०१४ ते २०१९ मध्ये कोकाटे हे भाजपमध्ये होते. २०१९ मध्ये छगन भुजबळ यांनीच कोकाटे यांना राष्ट्रवादीत आणलं होतं. भुजबळ यांच्या दाव्याप्रमाणे त्यावेळी कोकाटे यांना पक्षात घेण्यास शरद पवार यांचा विरोध होता. पण भुजबळांनी आपल्यामुळे त्यांना पक्षात घेतल्यांच सांगितलं होतं. भुजबळांनी राष्ट्रवादीत आणलेल्या कोकाटे यांना त्यानंतर मंत्रीपदाचे डोहाळे लागले होते.

त्यानुसार त्यांनी अजित पवार यांच्याशी जवळीक साधण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर कोकाटे अजित पवार यांच्यासोबत होते. त्यांनी लोकसभेत राजाभाऊ वाजे यांना छुपी मदत करत विधानसभेचा रस्ता क्लिअर करून घेतला. आमदार झाल्यानंतर मंत्रीपद मिळवण्यासाठी भुजबळांना बाजुला करणं गरजेचं होतं. त्यात ते यशस्वी झाले, भुजबळांना बाजूला सारत त्यांनी थेट मंत्री पदावर उडी घेतली, तेथूनच भुजबळ विरुद्ध कोकाटे वादाचा नवा अंक सुरु झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com