Shivsena-Bjp-Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

BJP Political News : भाजपची गाडी सुसाट,महापालिका स्वबळावरच लढणार! युतीचा प्रस्ताव फेटाळला..

Shiv Sena wants an alliance in the Municipal Corporation, but BJP should go alone :भाजपने सुरुवातीपासूनच महापालिका आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : राज्यात महायुतीची सत्ता आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) विराजमान झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा आत्मविश्वास कमालीचा बळावला आहे. 132 हून अधिक आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री पद हातात असल्यामुळे भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत युती करण्याच्या मनस्थितीत नाही. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

महायुती म्हणून (BJP) भाजप-शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार की स्वबळावर? याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. परंतु भाजपने सुरुवातीपासूनच महापालिका आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही संभाजीनगर महापालिकेवर भाजपचा महापौर बसला पाहिजे, असा आग्रह धरला आहे.

त्यानंतर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी वारंवार ही सर्वसामान्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे त्यांना संधी मिळावी यासाठी महापालिका निवडणूक आम्ही स्वबळावरच लढणार, असे स्पष्ट केले. तर दुसरीकडे युती न झाल्यास एमआयएमचे फावेल, या भीतीने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मात्र अजूनही युती होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

युती न झाल्यास एमआयएमचा फायदा होईल आणि तसे होऊ नये यासाठीच आम्ही भाजपला युतीचा प्रस्ताव देणार असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. मात्र यानंतरही भाजपचा सूर स्वबळावर लढण्याचा असल्याने महापालिकेत महायुती नसणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. राहिला प्रश्न एमआयएमचा फायदा होण्याचा तर भाजपने आम्ही एमआयएमचा प्रभाव आता कमी केला आहे.

विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा पराभव केला आहे, असे म्हणत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर मागे हटण्यास तयार नाहीत. स्थानिक पातळीवर भाजपचा हा सूर पाहता मंत्री संजय शिरसाट यांनीही आम्ही स्वबळावर लढू शकतो. आमच्या पक्षाची ताकद वाढली आहे, असा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता शिल्लक राहिला नाही, असे म्हणत भाजपला प्रतिआव्हान दिले आहे. एकूणच राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना भाजपने स्थानिक पातळीवर मात्र स्वबळाचा नारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT