Municipal Corporation Election: महापालिका स्वबळावर लढण्याची खुमखुमी! पण एमआयएमची भितीही..

Chhatrapati Smabhajinagar Local Body Election : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट स्वबळाची भाषा केली नसली तरी भाजपने आमचा युतीचा प्रस्ताव नाकारला, तर मात्र आमची तयारी असेल, असे सांगत स्वबळाचे संकेत दिले.
Chhatrapati Smabhajinagar Municipal Corporation
Chhatrapati Smabhajinagar Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाले. तर महाविकास आघाडीची धुळधाण उडाली आहे. महायुतीला एकत्रित लढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोनशे पार जागा जिंकता आल्या. पण आगामी महापालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती नको, असा सूर स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांकडून आळवला जात आहे.

अशीच परिस्थिती महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे. (Mahayuti) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर स्वबळावर लढण्याची पदाधिकारी, शिवसैनिकांची इच्छा घातली आहे. त्यांचा आदेश येईल त्या पद्धतीने लढू, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

Chhatrapati Smabhajinagar Municipal Corporation
Mahayuti Government : तीन आमदार, तरी भाजपला मिळाले होते विरोधी पक्षनेतेपद; महाराष्ट्रात काय होणार?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट स्वबळाची भाषा केली नसली तरी भाजपने आमचा युतीचा प्रस्ताव नाकारला, तर मात्र आमची तयारी असेल, (Mahavikas Aghadi) असे सांगत स्वबळाचे संकेत दिले.

Chhatrapati Smabhajinagar Municipal Corporation
Mahavikas Aghadi : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून 'मविआ'त बिघाडी? ठाकरेंच्या नेत्याच्या 'त्या' ट्विटवर काँग्रेसचा आक्षेप, नेमकं प्रकरण काय?

भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी मात्र एकट्यानेच महापालिका निवडणूक लढणार असल्याचे सांगून टाकले. लोकसभा, विधानसभा या निवडणुका नेत्यांच्या असतात, तर महापालिका, जिल्हा परिषद या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या असतात. अशा निवडणुकांमध्येच त्यांना संधी मिळत असते.

Chhatrapati Smabhajinagar Municipal Corporation
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : विधानसभेला जागा वाढताच भाजपकडून स्वबळाचा नारा!

गेल्या पाच वर्षात भाजपची शहरात व जिल्ह्यात झालेली संघटनात्मक बांधणी पाहता महापालिकेची निवडणूक स्वबळावरच लढली पाहिजे, असा प्रत्येक भाजप कार्यकर्त्याची भावना आहे, असे बोराळकर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे महायुती-महाविकास आघाडी स्वबळावर लढली तर याचा थेट फायदा एमआयएमला होऊ शकतो, अशी भिती शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केली आहे.

Chhatrapati Smabhajinagar Municipal Corporation
ShivSena Politics : मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंची फिल्डिंग; संघटना बांधणीचा हा आहे 'प्लॅन'

एमआयएम सारख्या जातीयवादी पक्षाला रोखायचे असल्यानेच आम्ही भाजपला युतीचा प्रस्ताव देऊ. तो त्यांनी स्वीकारला तर ठीक, नाहीतर आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे जंजाळ यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच महापालिकेत प्रत्येक पक्षालाच स्वबळाची खुमखुमी असल्याचे चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पहायला मिळते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com