फोटो स्टीकर वादानंतर शिवसेनेने धडा घेत पूरग्रस्तांना साध्या पिशव्यांमधून अन्नधान्य मदत पोहोचवली.
आमदार बांगर यांनी स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन थेट मदत केली.
या साध्या आणि प्रामाणिक उपक्रमाचे समाजाकडून कौतुक होत आहे.
Heavy Rainfall News : मराठवाड्यात पूर अतिवृष्टी आणि ढगफुटीने थैमान घातले आहे. लोकांचे संसार वाहून गेले, शेतीचे नुकसान झाले, हाती आलेली पीकं पावसाने ओरबडून नेले. घरातील धान्य, जीवनावश्यक वस्तू सगळ्यांवरच पाणी फिरले. अशावेळी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते मदतीला धावून आले पण ही मदत करताना स्वतःची जाहिरातबाजी केल्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली.
धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, (Eknath Shinde)जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोबत आणलेली अन्नधान्यांची मदत पूरग्रस्तांना देऊ केली. अनेक टेम्पोतून अन्नधान्याचे किट वाटण्यासाठी आणण्यात आले होते. परंतु पुरामुळे नुकसान झालेल्या सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या भावना इतक्या तीव्र होत्या की या मदतीच्या किटवर असलेल्या एकनाथ शिंदे व शिवसेना नेत्यांच्या स्टिकर वरून त्यांचा संताप झाला.
नैसर्गिक संकटाच्या काळातही मदतीच्या नावाखाली सुरू असलेली ही जाहिरातबाजी त्यांना खटकली. त्यामुळे मदतीसाठी आलेले टेम्पो परत घेऊन जा, अशी आक्रमक भूमिका गावातील लोकांनी घेतली. यातून धडा घेत कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी कुठल्याही प्रकारचा प्रचार किंवा स्टिकर लावून जाहिरातबाजी न करता शेतकऱ्यांना अन्नधान्याचे किट वाटप केल्याचे पाहायला मिळाले.
समाजकारण म्हटलं की राजकारण आलंच असे म्हणत बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्या फोटोचे स्टिकर असलेल्या किट वाटपाचे समर्थन केले. एकनाथ शिंदे हे कायम जनतेच्या मदतीला धावून जातात हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांना करू द्या, आम्ही मात्र संकटात सापडलेल्या लोकांना मदत करत राहणार, असे बांगर यांनी ठामपणे सांगितले.
पूरग्रस्तांना मदत करताना कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी किंवा श्रेय घेण्याचा प्रयत्न होऊ नये ही सर्व सामान्यांची अपेक्षा असते. एकनाथ शिंदे यांच्या फोटोचे स्टिकर लावून वाटप होत असलेल्या किटवर जेव्हा टीका झाली तेव्हा फोटो पाहू नका, मदत पहा असे म्हणत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर पुन्हा असा प्रकार कुठे घडू नये यासाठी कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता मदत करण्याचे आदेश मराठवाड्यासह राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना देण्यात आले आहेत.
संतोष बांगर यांनी कळमनुरी या आपल्या मतदारसंघातील दांडेगाव भागात पूरग्रस्तांना धान्याचे किट वाटप केले. ते करताना साध्या पिशवीमध्ये जीवनावश्यक वस्तू ते घरोघरी घेऊन जात होते. हिंगोली व कळमनुरी मतदार संघात सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगत माझा मतदारसंघ आणि हा भाग नदीकाठचा असल्यामुळे सर्वाधिक मदत शासनाकडून कळमनुरी मतदार संघाला मिळाल्याचे ते म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत दिली पाहिजे, अशी मागणीही बांगर यांनी यावेळी केली.
प्र.१. फोटो स्टीकर वाद काय होता?
उ. मदत साहित्यावर नेत्यांचे फोटो स्टीकर लावल्याने टीका झाली होती.
प्र.२. शिवसेनेने आता काय बदल केला?
उ. त्यांनी साध्या पिशवीतून कोणताही प्रचार न करता मदत केली.
प्र.३. ही मदत कोणी दिली?
उ. शिवसेना आमदार बांगर यांनी पूरग्रस्तांना मदत दिली.
प्र.४. पूरग्रस्तांनी या मदतीला कसा प्रतिसाद दिला?
उ. पूरग्रस्तांनी साधेपणाने दिलेल्या मदतीचे स्वागत केले.
प्र.५. या उपक्रमाबाबत लोकांची प्रतिक्रिया काय आहे?
उ. लोकांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत कौतुक केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.