Anil Jagtap  Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : शिवसेनेच्या जगतापांनी फोडला बॉम्ब; अबब...बीड मतदारसंघात...

Political News : बीडमधील प्रस्थापित राजकारण्यांनी स्वतःच्या विजयाची समीकरणे जुळून आणण्यासाठी बोगस मतदारांची नावे मतदान यादीत लावून घेतली असल्याचे प्रकार पुढे आला आहे.

Datta Deshmukh

Beed News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता बीडमधील प्रस्थापित राजकारण्यांनी स्वतःच्या विजयाची समीकरणे जुळून आणण्यासाठी बोगस मतदारांची नावे मतदान यादीत लावून घेतली असल्याचे प्रकार पुढे आला आहे.

बीड मतदारसंघाच्या मतदार यादीत बीड शहर व ग्रामीण भागातील मतदार यादीत दुबार तब्बल 25 हजार 161 एवढी दुबार नावे असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख अनिल जगताप (Anil Jagtap)यांनी केला आहे. ही दुबार मतदारांच्या यादीबाबत तात्काळ योग्य ती कारवाई करून लोकशाहीची गळचेपी रोखावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जिल्हा निवडणुक विभागाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीपेक्षा 55 हजार नवमतदारांची वाढ झाली आहे. लोकसभेला जिल्ह्यात 11लाख 34 हजार 284 पुरुष, 10 लाख 08 हजार 234 स्त्री मतदार तर 29 तृतीयपंथी असे एकूण 21 लाख 42 हजार 547 मतदान होते. आगाामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत 11लाख 58 हजार 998 पुरुष तर 10 लाख 38 हजार 809 महिला व 23 तृतीयपंथी असे एकूण 21 लाख 97 हजार 830 मतदार असतील.

बीड विधानसभा मतदारसंघात लोकसभेला असलेली 3 लाख 64 हजार 789 ही मतदारांची संख्या वाढून 3 लाख 78 हजार 180 झाली आहे. मात्र, या मतदान यादीत 25 हजार 161 मतदारांची नावे बीड शहरातल्या मतदार यादीत आणि ग्रामीण भागातील गावात देखील असल्याचा गंभीर आरोप अनिल जगताप यांनी केला.

त्यांनी या दुबार नावांची मतदान यादीच जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तसेच उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव यांना दिली. दुबार मतदारांच्या यादीबाबत तात्काळ योग्य ती कारवाई करून लोकशाहीची गळचेपी रोखावी, अशी मागणीही अनिल जगताप यांनी केली.

शिवसेना स्टाईलने कारवाईचा इशारा

बोगस मतदान करणाऱ्यांना एक वर्ष सश्रम करावासाची शिक्षा आणि पाचशे रुपये दंड असून मतदान यादीत दोनदा नाव असणाऱ्यांची यादी नावासह प्रत्येक पोलिंग बूथवर फलकावर प्रसिद्ध करणार असल्याचे अनिल जगताप म्हणाले. यामुळे विधानसभा निवडणुकी दरम्यान नेते, पुढऱ्याचं बळ पाठीशी आहे म्हणून कुणीही दुबार मतदानाचा हक्क बजावू नये. अशांवर शिवसैनिकांची आता करडी नजर राहणार आहे. दुबार मतदान करताना कुणी आढळून आल्यास शिवसेनेकडून त्यास त्याच ठिकाणी शिवसेना (Shivsena) स्टाईलने कारवाईचा इशाराही अनिल जगताप यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT