Maharashtra Loksabha Constituency News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena Loksabha News : शिंदे गटाचे ते दोन खासदार कोण ? ज्यांचे तिकीट कापले जाणार..

BJP News : शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या 22 जागांवर दावा केल्याची चर्चा होती.

Jagdish Pansare

Maharashtra News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील बडे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांचे वाटप कसे होणार हे सांगितले. (Shivsena Loksabha News) एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी महायुतीचे लोकसभेचे जागा वाटप झाल्याचे स्पष्ट करत भाजप 26 तर शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी प्रत्येकी 11 जागा लढवणार असल्याचे सांगितले.

राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बंड होऊन सत्तांतर झाले तेव्हा शिवसेनेचे13 खासदारही बाहेर पडले. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आणि 13 खासदार आहेत. (Devendra Fadnavis) फडणवीसांनी सांगितल्या प्रमाणे जर शिंदे गटाच्या वाट्याला लोकसभेच्या11 जागाच येणार असतील, तर मग ते दोन खासदार कोण? ज्यांची तिकीटं कापली जाणार, असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

विद्यमान खासदारांचे तिकीट कापू नये, अशी परंपरा असली तरी तसेच घडेल असे नाही, असा सूचक इशारा देत शिंदे गटाच्या काही विद्यमान खासदारांचे तिकीटही कापले जाणार, असे संकेत मिळत आहेत. (Shivsena) दरम्यान, शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या 22 जागांवर दावा केल्याची चर्चा होती. भाजपने मात्र त्यांचा दावा निम्म्यावर आणल्याचे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या उलट राज्याच्या सत्तेत उशीरा सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा मात्र लोकसभेच्या जागा वाटपात फायदा होतांना दिसतो आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे मिळून केवळ चार खासदार आहेत. तर दोन्ही शिवसेनेचे 18. मात्र राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे सुनिल तटकरे हे एकमेव निवडून आलेले खासदार असतांना त्यांच्या पक्षाला 11 तर शिवसेना शिंदे गटाकडे 13 खासदार असतांना त्यांना दोन जागा कमी अशी परिस्थिती आहे.

लोकसभेच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी यावरून महायुतीत खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे शिंदे गटाकडून सगळ्या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असे सांगितले जात आहे. पण फडणवीस यांच्या दाव्यानूसार जर शिंदे गटाच्या वाट्याला अकरा जागाच येणार असतील तर मग ते दोन खासदार कोण? ज्यांचे तिकीट कापले जाणार असा प्रश्न पडतो. की मग शिंदेंच्या शिवसेनेचे दोन खासदार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT