Lok Sabha Election 2024 : शिंदे गटाचे 13 खासदार पुन्हा लोकसभेच्या मैदानात; तिकीट कापणार असल्याच्या अफवा?

Eknath Shinde Led Shiv Sena : "नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते बसतील..:
Eknath Shinde Shiv Sena Contestants Lok Sabha 13 MP
Eknath Shinde Shiv Sena Contestants Lok Sabha 13 MPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान १३ खासदार पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरतील, अशी माहिती आता समोर येत आहे. लोकसभा निवडणुकींच्या तयारीला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde Shiv Sena Contestants Lok Sabha 13 MP
Shinde Vs Thackeray News : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ठाकरे गट - शिंदे गट भिडले; आरोप- प्रत्यारोपांनी वातावरण पेटलं

लोकसभा निवडणुका आता नजीक येऊन ठेपलेल्या आहेत. यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. शिंदे यांची शिवसेनाही महायुतीतला घटकपक्ष म्हणून तयारीला लागले आहेत. यावर आता शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाणे म्हणाले, "आमचे विद्यमान तेरा खासदार हे लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. त्यांनी याची जोमात तयारी सुरू केली आहे. आपापल्या मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने खासदार काम करत आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. तेरा खासदारांना मुख्यमंत्री शिंदेंनी निर्देश दिलेले आहेत."

तेरा खासदापैकी काही चेहरे बदलण्यात येणार आहे, पक्षाच्या चिन्हाबाबत काही ॲडजेस्टमेंट होणार आहे, अशी चर्चा होती, या प्रश्नावर तुमाणे म्हणाले, "हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विषय आहे. मात्र आम्ही तेरा विद्यमान खासदार पुन्हा लढणार यात काही शंका नाही," अशीही मोठी माहिती तुमाणे यांनी दिली.

Eknath Shinde Shiv Sena Contestants Lok Sabha 13 MP
MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट; अध्यक्षांसमोरील सुनावणीत काय घडलं ?

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"तिकीट देताना कसलाही फॉर्म्युला ठरलेला नाही. नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते बसतील आणि याबाबतचा योग्य तो निर्णय घेतील. त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला ठरेल, तो अंतिम असणार आहे. आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आणि महायुतीचे ४५ खासदार निवडून येणार, यात कसलीही शंका नाही, असा विश्वासही तुमाणेंनी व्यक्त केला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com