शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून मदतीसाठी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी फोनवरून धमकावले.
या घटनेचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
बांगर यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही.
Hingoli Heavy Rainfall News : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी महापूराने शेतकऱ्यांचे आतोनात नूकसान झाले आहे. कापूस,सोयाबीन, मका कोणतंच पीक शिल्लक न राहिल्याने शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. दिवाळीआधी संकटात सापडलेला शेतकरी नव्याने उभा राहिला पाहिजे, त्यालाही दिवाळी साजरी करता यावी, या हेतून त्या त्या भागातले लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत.
हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी एका पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला फोनवरून शेतकऱ्यांना मदत करा, वस्तुनिष्ठ पंचनामे करा हे सांगण्यासाठी फोन केला. कंपनीचे हित न पाहता शेतकऱ्याचे हित पहा, त्याची राखरांगोळी झाली आहे, काही चुकीचं केलं तर मात्र तुमचे हात पाय सलामत राहणार नाहीत, तुमच्या कंपनीच्या कार्यालयाचा चुराडा करू. शेतकऱ्यांच्या बाबतीत काही वाईट केलं तर मग संतोष बांगर सारखा वाईट माणूस कोणी नाही? असा दमही बांगर यांनी आपल्या स्टाईलमध्ये पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला दिला.
बांगर यांच्या या काॅलची रेकाॅर्डिंग सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अधिकाऱ्यांना धमकावणे, त्यांच्या कानशिलात लगावणे या प्रकारांमुळे शिवसेना (Shivsena) आमदार संतोष बांगर अनेकवेळा अडचणीत आले. पण आपल्या कृतीचे समर्थन करत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी असंच करणार, शिवसैनिक असाच असतो, असं सांगायलाही ते कचरले नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या या कारनाम्यांमुळे त्यांना देखील बराच त्रास दिला. लोकप्रतिनिधी आहात, कायदा हातात घेऊ नका, अशा सूचना तेव्हा शिंदे यांनी बांगर यांना दिल्या होत्या.
परंतू शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बांगर यांचा मुळ स्वभाव उसळून येतोच हे अनेकदा समोर आले. पीक विमा प्रतिनिधीशी बोलतांना बांगर यांनी बराच संयम बाळगल्याचेही जाणवते. बांगर यांनी तुझ्याकडे शेती हाय का माय? मग तु शेतकऱ्याचं लेकरू हायेस, तर सगळं नीट कर, शेतकऱ्याला मदत कर, असेही बांगर सांगत आहेत. हात पाय सलामत ठेवायचे असतील तर, किंवा हिंगोलीतील कार्यालयांचा चुराडा करू, ही त्यांची धमकी वाटत असली तरी त्यामागचा त्यांचा हेतू हा केवळ संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा हाच होता.
त्यामुळे बांगर यांच्या या काॅल रेकाॅर्डिंगनंतर टीके ऐवजी त्यांचे समर्थन होताना दिसत आहे. यंदाच्या पुरात शेतकऱ्यांची राख रांगोळी झाली, त्यांच्याकडे काहीही राहिलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे काहीही ठेऊ नका, शेतकऱ्यांना संकटकाळी मदत करा. सोयाबीन, कापूस आणि तुरी गेल्या. शेतातील माती सगळी वाहून गेली. मराठवाड्यामध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे, शेतकऱ्याचं जगणं वाट लागलं आहे. त्यामुळे वस्तुस्थितीला धरून सर्व्हे करा, असं बांगर वारंवा पीक विमा प्रतिनिधीला सांगत आहेत.
जर यात काही कमी जास्त झालं तर संतोष बांगरसारखा वाईट माणूस नाही. हिंगोलीत एकही माणूस ठेवणार नाही. तुमच्या ऑफिसचा चुराडा करेन. तुमचे हात पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पाहा, अशी धमकी बांगरांनी दिल्यानंतर तायडे नावाच्या पीक विमा प्रतिनिधीनेही भाऊ आम्ही वस्तुस्थितीनिष्ठच पंचनामा करू, अशी ग्वाही बांगर यांना दिली. मी या नंतर पुन्हा बोलणार नाही, जे काही आहे ते नियमानुसार करा असं बांगर म्हणाले. यावरही पीक विमा कंपनी प्रतिनिधीने सहकार्याचीच भूमिका दाखवली.
1. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी कोणाला धमकावले?
👉 त्यांनी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीला फोनवरून धमकावल्याचे वृत्त आहे.
2. ही घटना का घडली?
👉 शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीकविमा मदतीत विलंब आणि त्रुटी यावरून बांगर आक्रमक झाले.
3. या घटनेचा ऑडिओ व्हायरल झाला आहे का?
👉 होय, बांगर यांचा आणि प्रतिनिधीचा संभाषणाचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
4. संतोष बांगर यांची भूमिका काय आहे?
👉 ते म्हणाले की, शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठीच त्यांनी तीव्र शब्द वापरले, धमकावण्याचा हेतू नव्हता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.