Nilanga News ; शिवसैनिक 'उबाठा' गट का? सोडत आहेत याचे आत्मपरीक्षण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करणे गरजेचे आहे. शिवसेना वाढीसाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेतली. मात्र आमच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्या ऐवजी अवहेलना वाट्याला अली. गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेत होतो परंतु अतिशय जड अंतकरणाने आम्हाला शिवसेना सोडावी लागली असा आरोप नुकतेच शिंदे गटात सामील झालेले माजी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निलंगा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत. माने म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासूनच्या युतीतील भाजपला सोडून धोरणात्मक विचार न जुळणाऱ्या काँग्रेस ,राष्ट्रवादी सोबत आघाडी करणे म्हणजे बाळासाहेबांनी घालून दिलेल्या धोरण व विचारणा तिलांजली देण्या सारखे आहे.(Shivsena)
काँग्रेस,राष्ट्रवादी सोबत जाऊ नका असे अनेकवेळा श्रेष्ठींना सांगितले. परंतु याकडे दुर्लक्ष करून "उबाठा गट " आघाडीत सहभागी झाला. तर दुसरीकडे बाळासाहेबांचे विचार व पक्षाचे धोरण तंतोतंत राबविण्याचे काम सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत. आम्ही सतेसाठी नव्हे तर बाळासाहेबांच्या विचारासाठी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
निलंगा येथील १०९ पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांनी उबाठा गटाला सोडून गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली एक सक्षम व खंबीर सरकार देशाला मिळाले आहे. राज्यात भाजप,शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचे सरकार सक्षम पणे पुढे नेहत आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य ,विष्णू साब्दे, हरिभाऊ सगरे ,महिला आघाडीच्या सरोजा गायकवाड,धनराज बिराजदार,तानाजी सुर्यवंशी, बालाजी माने,भगवान जाधव,रब्बानी सौदागर आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.