Siddharth Shirole : यासाठी रात्रीच्या वेळी चालणारी बांधकामे बंद करा..

Nagpur winter session : आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विधानसभेत मागणी
Siddharth Shirole
Siddharth Shirolesarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagpur News : शहराचा वाढत असलेला विस्तार आणि ग्राहकांची गरज भागविण्यासाठी अनेक भागात दिवसाबरोबरच रात्रीच्या वेळी देखील बांधकामे सुरू असतात. बांधकामे कोणत्या वेळेत सुरू ठेवावी, याबाबत महापालिकेची कोणतीही नियमावली नाही. परिणामी अनेकदा बांधकाम रात्रीच्यावेळी सर्रासपणे सुरू असतात. यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी सुरू असणारी ही बांधकामे बंद करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये अनेक विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार एकमेकांवर तुटून पडत असल्याचे पहायला मिळत आहे. पुणे शहरात रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या बांधकामांबद्दल आमदार शिरोळे यांनी गुरुवारी लक्षवेधीच्या माध्यमातून बांधकाम नियमावलीचा विषय मांडला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Siddharth Shirole
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोना पॅाझिटीव्ह!

शिरोळे म्हणाले, पुणे शहर वेगाने वाढत आहे. दुप्पट वेगाने बांधकामे सुरू आहेत. अनेक भागात रात्रीच्या वेळी बांधकामे चालतात. बांधकामासाठीची वाहने, अवाढव्य यंत्रसामग्री यांच्या आवाजाचा त्रास आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना होतो. याबाबतच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत.

या संदर्भात माहिती घेतल्यानंतर महापालिकेकडून बांधकाम कोणत्या वेळेत सुरू ठेवावे तसेच हे काम करताना आजू‌बाजूच्या नागरिकांना काहीही त्रास होणार नाही, यासाठी काय काळजी घ्यावी, अशी कोणतीही नियमावली तयार केलेली नाही, असे निदर्शनास आल्याचे शिरोळे यांनी सांगितले. बांधकामे नक्की कोणत्या वेळेत करावीत, यासाठी महापालिकेला बांधकाम नियमावली करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी सभागृहात केली.

Siddharth Shirole
Ram Satpute : फडांना आग लागल्याच्या घटना...  सातपुतेंनी केली ही मागणी

रात्रीच्या वेळी शहरात सुरू असलेल्या बांधकामाचा त्रास होत असल्याने रात्रीच्या वेळी चालणारी बांधकामे तातडीने बंद करावीत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी ८ ते रात्री १० या वेळेतच बांधकामे करता येतात. त्या व्यतिरिक्तच्या वेळात बांधकामे करता येणार नाहीत, असे आदेश आहेत. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत रात्रीच्या वेळी बांधकामे सुरू असतात. ही बाब आमदार शिरोळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. .

Siddharth Shirole
Women Minister : मोदी मंत्रिमंडळातील या आहेत 10 महिला मंत्री

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com