District Bank Management Demand Affected Farmers Loan Waver News Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar District Bank : शिवसेनेची सत्ता असलेल्या जिल्हा बँकेचा कर्जमाफीसाठी पुढाकार

Farmers Loan waiver Demand In District BanK Meeting : सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असाही ठराव यावेळी घेण्यात आला.

Jagdish Pansare

  1. शिवसेनेच्या ताब्यातील संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा पुढाकार घेतला आहे.

  2. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

  3. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या या उपक्रमाची मोठी चर्चा सुरू आहे.

सुषेन जाधव

Shivsena News : मराठवाड्यात अतिवृ्ष्टी, महापूराने थैमान घातल्यानंतर शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. घरदार, शेती, पीकं, जनावरे, अन्नधान्य सगळंच वाहून गेल्याने शेतकऱ्याला तातडीने मदतीची गरज आहे. विरोध पक्ष, शेतकरी संघटनांकडून सातत्याने संपूर्ण कर्जमाफीची मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही राज्य सरकारला कर्जमाफी करण्याचा सल्ला दिला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेची (Shivsena) सत्ता असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्यात सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफीसाठी पुढाकार घेतला आहे. अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभेत या संदर्भात ठराव घेण्यात आला असून तो राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. अतिवृष्टी, महापूराने ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळली आहे, शहरालाही त्याच्या झळा बसल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा पर्याय त्यांनी सरकारला सूचवला होता.

गेल्या पंधरवाड्यात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पूर आला होता. यात अनेक शेतकऱ्यांच्या (Affected Farmers) हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 हजार 582 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा ठराव मांडण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा ठराव घेण्यात आला.

सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असाही ठराव यावेळी घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी संचालक मुकुंद मिरगे यांनी दिली. मिरगे यांनी प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीची तसेच आर्थिक स्थिती, विषयपत्रिकेचे वाचन केले. अध्यक्षीय समारोपात अर्जुन गाढे यांनी सभासदांसमोर 2024-25 मधील बँकेने केलेल्या प्रगतीचा आढावा मांडला. या वर्षात बँकेला 22 कोटी 87 लाख निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या 3137.89 ठेवी असून एनपीएचे 4.69 टक्के प्रमाण असल्याचे सांगितले.

राज्यातील पहिली बँक

शेतकरी कर्जमाफीचा ठराव मांडणारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील पहिलीच बँक आहे. यासोबतच कोणत्याही बँकेकडून कर्ज न घेता स्वनिधीतून कर्ज वाटप करणारी देखील ही एकमेव बँक असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, बँकेचे संचालक तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीच्या ठरावासोबतच रामकृष्ण गोदावरी जलसिंचन उपसा योजना ही जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. बँकेचे दुसरे संचालक शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पीककर्ज वाटप करण्यासाठी नवीन सभासदांना कर्ज वाटप धोरण ठरविण्यात यावे, अशी सूचना केली.

शेतकरी सभासदांसह अध्यक्ष अर्जुनराव गाढे, उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, आमदार रमेश बोरनारे, संचालक कृष्णा पाटील डोणगावकर, आप्पासाहेब पाटील, जावेद पटेल, जगन्नाथ काळे, दिनेश परदेशी, प्रभाकर काळे, रामहरी जाधव, डॉ. सतीश गायकवाड, मनोज राठोड, ॲड. विशाल कदम, जयराम साळुंके, गोकूळसिंग राजपूत, केशवराव तायडे, देविदास पालोदकर, रमेश डोणगावकर, एस.वाय. डकले, सहकार बॅंक सोसायटी चेअरमन विश्वासराव गाढे, सरव्यवस्थापक अजय मोटे, अण्णासाहेब वडेकर आदींची बैठकीला उपस्थिती होती.

FAQs

Q1. संभाजीनगर जिल्हा बँकेने काय निर्णय घेतला आहे?
➡️ शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा पुढाकार घेतला आहे.

Q2. ही बँक कोणाच्या ताब्यात आहे?
➡️ ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिवसेनेच्या ताब्यात आहे.

Q3. या निर्णयाचा फायदा कोणाला होणार आहे?
➡️ कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Q4. या निर्णयामुळे कोणती चर्चा रंगली आहे?
➡️ महाराष्ट्रात शिवसेना शेतकरीहिताची पक्ष असल्याची प्रतिमा मजबूत होत आहे.

Q5. कर्जमाफीचा परिणाम ग्रामीण भागावर कसा होईल?
➡️ शेतकरी आर्थिकदृष्ट्या सावरतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT