Ajit Pawar : शेतकरी कर्जमाफी लटकणार; फडणवीसांच्या घोषणेवर अजितदादांचे प्रश्नचिन्ह; म्हणाले ‘अंथरूण पाहून...’

Farmers Loan waiver Issue : राज्याचा आर्थिक गाडा आपल्याकडे आहे. आपण दोघं नंतर बसू...मी तुला माझी परिस्थिती सांगतो...मग तू मला तुझा सल्ला दे. मग त्याच्यातून काही जमत असेल तर आपण कर्जमाफीही करू. आपण करायला कमी पडणार नाही.
Ajit Pawar-Devendra Fadnavis
Ajit Pawar-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune, 10 January : विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. निकालानंतरही त्यांनी कर्जमाफी योग्य वेळी करण्यात येईल, असे विधान केले होते. मात्र, फडणवीसांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर खुद्द अर्थमंत्री अजित पवार यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दौंडमधील एका कार्यक्रमात बोलताना माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचा विषय ऐकला का? ....अंथरूण पाहून हातपाय पसरायचे असतात, असे सांगून फडणवीसांच्या कर्जमाफीच्या घोषणेबाबत अनिश्चितता निर्माण केली आहे.

दौंड तालुक्यातील दौंड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत भाष्य केले आहे. या कार्यक्रमात बोलताना तुमच्या कानावर काही चुकीचं आलं, तर तुम्ही मला येऊन सांगा. दर आठवड्यातून एक दिवस पुण्याला मी थांबणार आहे. याशिवाय बारामतीलाही थांबण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

बारामती तुम्हा दौंडच्या जनतेला जवळच आहे. तुम्ही तुमची कामं येऊन सांगत जावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या भाषणातून करत होते. तेवढ्यात उपस्थितांमधून कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार, अशी विचारणा झाला. त्यावर अजितदादा म्हणाले, माझा भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचा (Loan waiver ) विषय ऐकला का हो?. विधानसभा निवडणुकीत मी जेवढी भाषणं केली.... हे बघ...अंथरूण पाहून हातपाय पसरायचे असतात.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
Konkan Politic's : ठाकरेंना कोकणात धक्का?; विधानसभा लढवलेला बडा नेता भाजपच्या वाटेवर, बावनकुळेंची घेतली भेट

राज्याचा आर्थिक गाडा आपल्याकडे आहे. आपण दोघं नंतर बसू...मी तुला माझी परिस्थिती सांगतो...मग तू मला तुझा सल्ला दे. मग त्याच्यातून काही जमत असेल तर आपण कर्जमाफीही करू. आपण करायला कमी पडणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

तेवढ्यात उपस्थितांमधून लाडक्या बहिणींनी जसा महायुती सरकारला पाठिंबा दिला, तसाच शेतकऱ्यांनीही दिला आहे, असा मुद्दा मांडण्यात आला. त्यावरही अजित पवार यांनी तातडीने खुलासा करताना ‘म्हणूनच पाच आणि साडेसात एचपी मोटारीचे वीजबिल माफ केले आहे. काही लोकांची तीन, साडेतीन, चार लाखांपर्यंत वीजबिलं होती. ती झिरो करून दिली आहेत, झिरो, असाही दावा अजितदादांनी केला.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
Vishal Patil : अपक्ष असल्याने तुम्ही म्हणाल त्याठिकाणी येण्याची माझी तयारी; खासदार पाटलांचे भाजप नेत्यासमोर सूचक विधान

दुधाच्या अनुदानाची शिल्लक रक्कम यापुढील काळात तातडीने दिली जाईल. दुधाचं, लाडक्या बहिणींचं आणि वीजमाफीचं चालू राहणार आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही, असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com