Former Chhatrapati Sambhajinagar mayor Rashid “Mamu” Khan addresses the media after joining Shiv Sena UBT, responding to BJP criticism over his party entry. Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT : पक्षप्रवेशावर टीका करणाऱ्या 'राशीद मामू' यांचा भाजपवर पलटवार; म्हणाले, निवडणुकीत तुम्हालाच खान लागतो!

Rashid Mamu Khan statement : शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर भाजपच्या टीकेला माजी महापौर रशीद मामू खान यांनी जोरदार प्रत्युत्तर देत भाजपवर निवडणुकीपुरते धार्मिक राजकारण केल्याचा आरोप केला.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : भाजपकडून महापालिकेची निवडणूक विकासाऐवजी हिंदू-मुस्लीम विषयावर नेण्याचा प्रयत्न सुरू असून, भाजपलाच खान लागतो. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मी हिंदुस्थानी आहे, विश्‍व हिंदू परिषदेचे देवेंद्र शर्मा माझे गुरू आहेत. सर्वच जातिधर्मांमध्ये माझे चांगले संबंध आहेत, पण सोशल मिडीयावरून माझी बदमानी केली जात असून, याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली असल्याचे माजी महापौर रशिद मामू यांनी शनिवारी सांगितले.

माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांचा नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाला. मुंबईत मातोश्रीवर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मामूंना पक्षप्रवेश मिळवून दिला. पक्षातील दुसरे नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला आहे. त्यांना उमेदवारी मिळू देणार नाही, असा इशाराही त्यांनी मामू आणि दानवे यांनाही दिला. याच मामूंच्या प्रवेशावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरेंचा पक्ष आता मामूंचा झाला आहे, अशी टीका केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मामूंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशाची दखल घेत टीका केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी मराठवाडा मुक्तिसंग्राम आंदोलनातील कार्यकर्ता असून, अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. माझ्यावर धर्मांध म्हणून एकही गुन्हा नाही. ठाकरे गटात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करताच भाजपने मला धर्मांध ठरवून राज्यभर बदनामी सुरू केली.

एकीकडे भाजप विकासाचा अजेंडा राबवितो तर दुसरीकडे हिंदू-मुस्लीमामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 50 वर्षापासून सार्वजनिक जीवनात मी काम करीत आहे. जिल्हा गणेश महासंघाने कार्यकर्ता म्हणून माझा गौरव केला. अनेक पुरस्कार मला देण्यात आले, शहराचा महापौर म्हणून महापालिकेत वंदे मातरम् ने सर्वसाधारण सभेला सुरुवात केली. माझ्यावर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा पुरावा द्यावा, दंगल घडवून आणल्याचाही पुरावा द्या, असे आव्हान रशीद मामू यांनी दिले. भाजपला (BJP) निवडणूक आल्यावरच 'खान'ची गरज भासते, असा टोलाही रशीद मामू यांनी लगावला. शहराचा मी महापौर झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी दीड तास माझ्यासोबतच चर्चा केली होती. 'चांगला महापौर आहे, त्रास देऊ नका', असे त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते, अशी आठवणही रशीद मामू यांनी सांगितली.

खैरेंचा विरोध गैरसमजातून

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून सुरू असलेला विरोध गैरसमजातून आहे. खैरे हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्यावर माझी कोणतीही नाराजी नाही, असे रशीद मामू म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT