Threat Email to Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : खळबळजनक ! शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी

Shinde Shiv Sena leader threat News : धमकीला घाबरून काम बंद करून बसणार नाही, असेही अर्जुन खोतकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामा ब्युरो

jalna News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. चार वेगवेगळ्या इंस्टाग्रामवरून गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याची फिर्याद अभिमन्यू खोतकर यांनी जालना तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणात आता गुन्हा देखील करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेकडून केला जात आहे. दरम्यान, धमकीला घाबरून काम बंद करून बसणार नाही, असेही अर्जुन खोतकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार वेगवेगळे इन्स्टाग्राम अकाउंट वापरुन आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांच्याविरुद्ध अश्लील शिवीगाळ करत त्यांना गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेमुळे जालना जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी जालना तालुका पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेमध्ये वापरण्यात आलेल्या संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटची सखोल चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच या अज्ञात व्यक्तीचा शोध देखील पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यानी दिली आहे.

दरम्यान, धमकी आली असली तरी त्याला घाबरून काम बंद करून बसणार नाही. जे धमक्या देतात त्यांना आम्ही निश्चितपणे सरळ करू. गेल्या काही दिवसात आयपीएलचा सट्टा, मटका व अवैध धंदे उघड केल्याने काही जणांना पोटदुखी होत असणार आहे. त्यामुळे अशास्वरूपाच्या धमक्या दिल्या जात असतील. त्यामुळे आम्ही काही शांत बसणार नाहीत, या सर्वांचा बंदोबस्त करू, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.

यापूर्वी अनेकवेळा मला धमक्या आल्या आहेत. पण आम्ही हे सर्व काही सिरियसली घेत नव्हतो. पण आता या प्रकरणी माझ्या मुलाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धमकी आल्याने मी माझे कोणतेही काम बंद ठेवणार नाही. माझे काम सुरूच राहणार असल्याचे खोतकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT