Pune News : राज्यात गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून पक्ष बदल करण्याचे सत्र सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडली तर त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत महायुतीसोबत जुळवून घेतले आहे. त्यानंतर झालेल्या लोकसभा व नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक नेतेमंडळीने सोयीनुसार पक्षांतर करीत पदे पदरात पाडून घेतली आहेत.
केंद्रात व राज्यात महायुतीची सत्ता असल्याने गेल्या काही दिवसापासून त्यांच्याकडील इनकमिंग जोरात वाढले आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळी त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश करीत असल्याने आता भाजपच्या मंत्र्यांने ठाकरेंच्या आमदाराला पक्षप्रवेश करण्याची खुली ऑफर दिली आहे.
पुणे जिल्हयातील खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील गावासाठी पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या, असे म्हणत ठाकरे गटाच्या आमदाराला पक्ष बदल करण्याचा सल्ला देत भाजपमध्ये (Bjp) येण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
पुणे जिल्हयातील टंचाईग्रस्त गावासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 36 दुष्काळग्रस्त गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणी परिषदेची बैठक घेण्यात आली. त्यावेळी कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी खेड विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे यांना पक्ष बदलण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी लोक कधीही बाभळीच्या झाडाखाली उभे रहात नाहीत. लोक आंब्याच्या झाडाची सावली पाहतात आणि आंबे कुठे मिळतात हेच शोधतात. त्यामुळे तुम्ही आंब्याच्या झाडाकडे या आणि पाण्याचा प्रश्न सोडवा, अशा शब्दांत गोरे यांनी शिवसेनेचे बाबाजी काळे यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर या पाणी परिषदेवेळी दिली.
त्यासोबतच येत्या काळात उत्तर पुणे जिल्ह्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत गोरे यांनी 36 गावांतील ग्रामस्थांना जनतेच्या पाणीप्रश्नासाठी शासनदरबारी वकील म्हणून काम करण्याचे आश्वासन दिले. त्यासोबातच यावेळी गोरे यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना दिलेल्या या खुल्या ऑफरची चर्चा रंगली होती. त्यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांनी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, येत्या काळात ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.