Shrikant Shinde Sarakarnama
मराठवाडा

Shrikant Shinde : ''पाथरीत आता 'खान' अन् 'बाण' दोन्हीपण'' ; श्रीकांत शिंदेंचं विधान!

Shiv Sena News : भाषण सुरु असताना मराठा आरक्षणासाठी आंदोलकानी केली घोषणाबाजी; जाणून घ्या पुढे काय घडले?

प्रसाद जोशी - Guest Sarkarnama

Parbhani news : 'शिवसेना(शिंदे गट) अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या माध्यमातून अल्पसंख्य समाजातील नेते शिवसेनेशी जोडले जात आहेत. आतापर्यंत खान की बाण असा प्रश्न विचारला जात होता. मात्र पाथरीत आता खान आहे आणि बाण पण आहे.'' असे प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे यांनी रविवारी पाथरी येथे केले.

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी रविवारी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे बोलत होते.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांचे भाषण सुरु असताना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही आंदोलकानी घोषणाबाजी करत भाषणात व्यत्यय आणला. यावर खासदार शिंदे यांनी भाषण थांबवून आंदोलकांना व्यासपीठावर बोलावत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर मात्र या आंदोलकांनी स्टेजवरूनच मुख्यमंत्री शिंदेचा जयघोष केल्याचे पाहायला मिळाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

''मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आहे. त्यामुळे मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळेल.'' असे श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांनी सांगितल्यानंतर आंदोलकानी आपल्या भावना व्यक्त केल्या. ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे.'' असं आंदोलकांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जयघोष केल्याने त्यांचा निषेधाचा सूर मावळून गेला होता.

यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले, ''आताची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सरकार करत असलेल्या कामांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा.''

परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु पाथरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी हे सत्तेच्या केंद्रस्थानी होते. त्यामुळे निवडणूक प्रचारात खान हवा की बाण असा प्रचार व्हायचा. मात्र आता सईद खान यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पक्षाने त्यांना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष केले. त्यामुळे पाथरीत आता खानही आहे बाण ही आहे अशी मिश्किल टिप्पणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT