Manoj Jarange: शिंदे गटाचा जरांगेंच्या सभेला पाठिंबा? श्रीकांत शिंदेंसह माजी नगरसेवकांचे फोटो झळकले बॅनरवर!

Maratha Reservation: सभेपूर्वीच परिसरात बॅनरची चर्चा रंगली
Manoj Jarange
Manoj Jarange Sarkarnama

Dombivali: मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची आज (सोमवार) कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात संध्याकाळी सभा आहे. सभेपूर्वीच परिसरात बॅनरची चर्चा रंगली आहे. बॅनरवर मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह माजी नगरसेवक यांचे फोटो आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील सभेला शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही पहिली सभा असल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून सभेसाठी जोरदार तयारी केली आहे. सर्वत्र झेंडे, बॅनर लावण्यात आले आहेत. या सभेचे बॅनर हा चर्चेचा विषय बनला आहे. शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचेदेखील फोटो झळकले आहेत. माजी नगरसेवक नवीन गवळी, माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी, माजी नगरसेवक नीलेश शिंदे, शहरप्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक विशाल पावशे यांचे फोटो या बॅनरवर आहेत. त्यामुळे हा बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange
Ram Shinde: अलर्ट राहा! अजून बरेच बाॅम्ब फुटणार? जगतापांच्या भेटीवर राम शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

जरांगेंनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यांचा दौराही सुरू आहे. दुसरीकडे आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे कामही सुरू आहे. या समितीतील नेत्यांना जरांगे आज फोन करून आरक्षणाचं काय झालं, असा सवाल करणार आहेत. आळंदीत ते माध्यमांशी बोलत होते.

आपण काल (रविवार) दिवसभर नेत्यांना फोन लावत होतो. मात्र, कुणाशीही संपर्क झाला नाही, आज (सोमवार) पुन्हा सरकारच्या समितीतील नेत्यांना फोन लावून आरक्षणाचं काय झालं विचारणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं. जरागेंची आज कल्याण आणि पुण्यातील खराडीत सभा आहे. सभेसाठी सकल मराठा समाजाने जोरदार तयारी केली आहे. रविवारी मध्यरात्री त्यांची देहूत सभा झाला. सभेत त्यांनी छगन भुजबळांचा जोरदार समाचार घेतला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांवर त्यांनी टीकास्त्र सोडलं.

"छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते, पण व्यक्ती म्हणून कधीच विरोध नव्हता. मात्र, आता व्यक्ती म्हणूनसुद्धा विरोध आहे. त्यांनी किती उचकवलं तरी शांत राहा, मला त्यांचं सगळं माहीत आहे, मुंबईमधून आल्यावर काय केलं, येवल्यातून आल्यावर काय केलं. हे सर्व मला माहीत आहे," असा गौप्यस्फोट जरांगेंनी देहूमधील सभेत केला.

Manoj Jarange
Manoj Jarange: आरक्षणाचं काय झालं? समितीतील नेत्यांना जरांगे जाब विचारणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com