Manoj Jarange Patil : 'मराठा समाजाला शांतच राहुद्यात, डिवचाल तर सरकारला जड जाईल'

Maharashtra Political News : मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Ausah News : आम्ही आमच्या लेकरांबाळांच्या भविष्यासाठी संघर्ष करतोय कुणावर अन्याय करीत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचे लक्षात आल्यावर छगन भुजबळ ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र तुम्ही समाजात तेढ निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करु नका. संयम आणि शांतता राखा. आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आली असुन आता आरक्षणा शिवाय सरकारला सुट्टी नाही. मराठा समाज शांत आहे. त्याला शांतच राहू द्या आम्हाला डिवचाल तर हे अंदोलन तुम्हाला खुप जड जाईल. असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला.

औसा येथे रविवारी झालेल्या सभेत जरांगे पाटील म्हणाले, राज्यात पस्तीस लाख कुणबी नोंदी आढल्या आहेत. त्या आधारे मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यासाठी सरकारला चोवीस डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यामुळे सरकारला आरक्षण द्यावेच लागेल. पण सध्या मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे लावण्याचे काम छगन भुजबळ करीत आहेत. आरक्षणा पासून आपले लक्ष विचलीत करण्याचा त्यांचा डाव असुन आपल्या संयमाने व शांततेने हा डाव उधळून लावण्याचे आवाहन जरंगे यांनी केले. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Chhattisgarh New CM: कोण आहेत विष्णुदेव साई? वाचा छत्तीसगडच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा राजकीय प्रवास

छगन भुजबळ यांना उत्तर देताना जरंगे म्हणाले, भुजबळ यांचे आता वय झाले आहे. पस्तीच चाळीस वर्षे प्रशासनाचा अनुभव असतांना आणि कायदा पायदळी तुडवून ते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करीत आहेत. मात्र तुम्ही शांत रहा असा सल्ला त्यांनी दिला. 

विविध ठिकाणी सत्कार

औशात सभेला येताना जरांगे पाटील यांनी टेंबी येथील अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अण्णासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी जरांगे पाटलांना गहिवरून आले होते.  तिथे त्यांचा बोरफळ देऊन सत्कार करण्यात आला. औशातील किल्ल्याशेजारी जरांगे पाटील आले असता त्यांचा भव्य सत्कार मुस्लिम समाजाच्या वतिने करण्यात आला.

Manoj Jarange Patil
Satej Patil : के. पी. पाटलांनी पकडला काँग्रेसचा हात; महायुतीचा होणार ‘राधानगरी' घात 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com