Abdul Sattar News Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांचा भलताच कॉन्फिडन्स! ; किती लीडने निवडून येणार आकडाच सांगितला

Abdul Sattar Politics : 'मी राजकारणातला जुना खेळाडू आहे. या क्षेत्रात आता एमडी, सर्जन झालो आहे.' असंही सत्तार म्हणाले आहेत.

Jagdish Pansare

Sillod Assembly Constituency and Abdul Sattar : सिल्लोड मतदार संघातून यावेळी मी एक लाख ४० हजार मतदारांनी निवडून येणार, असा दावा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी (ता.२९) केला. मी राजकारणातला जुना खेळाडू आहे.

या क्षेत्रात आता एमडी, सर्जन झालो आहे. सिल्लोडमध्ये ३ लाख २० हजार हिंदू आणि ६० हजार मुस्लिम मतदान आहे. २७ हजार बोगस मतदार घुसवले असे सांगणाऱ्यांनी अभ्यास करावा, असा टोला त्यांनी नाव न घेता भाजपला लगावला.

टीव्ही सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराज साहसी पार्कच्या लोकार्पणप्रसंगी सत्तार बोलत होते. पुढे सत्तार म्हणाले, २५ वर्षांपासून मी सत्तेत आहे. जिकडे सत्ता तिकडे मी असतो. मंत्री म्हणून अनेक खाते सांभाळले.

पालकमंत्री म्हणून अनेक जिल्ह्यात काम केले. पण, छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संधी दिली. माझे आणि भुमरेमामाचे काम सरळ आहे. त्यामुळे कामे करताना तुम्हाला त्रास होणार नाही, असे सत्तार यांनी महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांना सांगितले.

काहींनी सिल्लोडमध्ये २७ हजार बोगस मतदार आहेत, असा आरोप केला. पण, १८ हजारापेक्षा जास्त मुस्लिम समाज नाही. ते चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतात, पण कसाही चेंडू टाकला तरी तो खेळण्याची ताकद माझ्यात आहे. त्यामुळे एवढी वर्षे सत्तेत आहे, असा टोला सत्तार(Abdul Sattar) यांनी लगावला.

यावेळी १ लाख ४० हजार मतांनी विजयी होईन, असा दावा त्यांनी केला. प्रदीप जैस्वाल व मी लोकांच्या ओठात, पोटात आणि बोटात काय हे लगेच ओळखतो. त्यामुळेच विजयी होतो, असा दावा सत्तार यांनी केला. ‘तुम्ही मंत्री व्हा, पालकमंत्री व्हा, आपल्या शुभेच्छा असल्याचे सत्तार प्रदीप जैस्वाल यांना उद्देशून म्हणाले.

फुटबॉल मैदानाचे महापालिकेमार्फत काम -

आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान विकसित केले जाणार आहे. हे काम आगामी सहा महिन्यात महापालिकेमार्फत सुरू करण्यात येईल, असे सत्तार यांनी सांगितले. इटली देशाच्या कंपनीसोबत त्यासाठी करार केला जाईल. १७ सप्टेंबरला मुख्यमंत्री शहरात येतील, त्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा संकेत सत्तार यांनी दिले.

काय होता भाजपचा आरोप? -

सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील २७ हजार नावे दुबार असल्याचा आक्षेप भाजपकडून (BJP) घेण्यात आला आहे. ही नावे रद्द करावीत अशी मागणी २० ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

(Edited - Mayur Ratnapakhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT