Shivsena Vs Ncp : शिंदे गटाच्या नेत्याचे वादग्रस्त विधान; म्हणाले,'राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसलो तरी उलट्या होतात...'

Shivsena News : महायुतीमधील घटक पक्षातील वाद मिटला असे वाटत असतानाच शिंदे गटाच्या मंत्र्यांने खळबळजनक विधान केले असून त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच महायुतीमधील घटक पक्षातील वाद मिटला असे वाटत असतानाच शिंदे गटाच्या मंत्र्यांने खळबळजनक विधान केले असून त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी एका कार्यक्रमावेळी खळबळजनक दावा केला आहे. मी कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आपले आयुष्यात कधीच पटले नाही. शाळेत असल्यापासून आतापर्यंत त्यांच्यासोबत कधीच पटले नाही. आम्ही कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही, असे विधान करीत राष्ट्रवादी काँग्रेसवर सावंत यांनी टीका केली आहे.

सावंत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसशी आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलो पण बाहेर आल्यावर उलट्या होतात वक्तव्य पालकमंत्री सावंत यांनी केले. त्यानंतर सावंत यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे येत्या काळात आता महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

त्यामुळे त्यांच्यावर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना जी मळमळ होतेय, त्याचा इलाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा, असे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे येत्या काळात शिवसेना (Shivsena ) शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात वाद रंगण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis
Shivsena UBT News : ठाकरेंच्या आमदाराच्या अडचणीत वाढ; निवडणूक जिंकली पण..

सावंतांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी म्हणाले, 'सावंतांना उलट्या कशामुळे होतात हे माहिती नाही. तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत, आरोग्याचा काही संबंध असेल. मात्र महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे मुख्यमंत्री शिंदेच सांगू शकतील. सावंत हे अशाप्रकारचे वादग्रस्त वक्तव्य वारंवार करतात. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच त्यांना तंबी द्यावी अशी मागणीही मिटकरी यांनी केली.

येत्या काळात विधानसभेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक महायुतीच्या तीनही पक्षांनी एकत्र राहून लढवायची ठरवली असेल तर अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य का केली जातात हे समजत नाही. राणेंचे किंवा सावंतांचे हे वक्तव्य का केले जाते हे माहिती नाही. त्यामुळे येत्या काळात सावंतांचा इलाज हा मोठे डॉक्टर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा, असेही मिटकरी म्हणाले.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis
Gondiya Assembly Election : गोंदिया जिल्ह्यात विधानसभेसाठी चुरस; मविआ अन् महायुतीची प्रतिष्ठा पणाला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com