Abdul Sattar News : सरकारने दिले, बॅंकांनी कापून घेतले ; लाडक्या बहिणी नाराज

Ladki Bahin Yojana money cut by bank, Guardian Minister Sattar angry : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळालेली रक्कम पीक विमा, पीककर्ज यासह कोणत्याही शासकीय योजनेचे अनुदान कपात न करता ते पूर्णपणे लाभार्थ्यांना द्यावे, असे निर्देश अब्दुल सत्तार यांनी बँकांच्या प्रतिनिधींना दिले.
Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
Published on
Updated on

Guardian Minister Abdul Sattar News : राज्यात सध्या सर्वत्र चर्चा आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची. विरोधकांनी कितीही टीका केली तरी सरकार या योजनेचे श्रेय आणि त्यातून महिलांची मतं मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. पण राज्य सरकारच्या या योजनेत बॅंका काही प्रमाणात खिळ मारताना दिसत आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम बॅंका थकित कर्ज वसुली, पीकविमा या नावाखाली कपात करून घेत आहेत.

या प्रकारच्या असंख्य तक्रारी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि राज्याच्या विविध भागातून होत आहेत. यामुळे महायुती सरकारची डोकेदुखी वाढली आहे. (Abdul Sattar) एकतर सर्व पात्र लाडक्या बहीणींच्या खात्यात अजून रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे जाहीर कार्यक्रमात महिला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जाब विचारत आहेत.

तर दुसरीकडे ज्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले, त्या बॅंका हे पैसे कपात करून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत बॅंकांना चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध योजना, अनुदानाची रक्कम बँकेने कपात करू नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत बॅंकाना दिल्या आहेत.

Abdul Sattar
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजना स्थगित करण्यासाठी याचिका, भाजपने पकडले काँग्रेसला कोंडीत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळालेली रक्कम पीक विमा, पीककर्ज यासह कोणत्याही शासकीय योजनेचे अनुदान कपात न करता ते पूर्णपणे लाभार्थ्यांना द्यावे, असे निर्देश अब्दुल सत्तार यांनी बँकांच्या प्रतिनिधींना दिले. (Shivsena) याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, अन्नपूर्णा योजना, बळीराजा वीज सवलत योजना, वयोश्री आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांचा आढावा सत्तार यांनी बैठकीत घेतला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे व त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे, ती रक्कम कोणत्याही शुल्काच्या किंवा वसुलीच्या नावाखाली कपात न करता पूर्ण अनुदान अदा करा. कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार उद्योजकता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व युवक आणि शासन यांच्यातील दुवा म्हणून या विभागांनी काम करावे.

Abdul Sattar
Video Shivsena UBT : 'चार आणे, बारा आणे, अटक करा नारायण राणे!' मालवणमधील राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक

बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत 7.5 क्षमतेच्या पंप असणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिलात पूर्णपणे माफी देण्यात आली असून जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा. पीक कर्ज आणि पीक विमा याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत बँकांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांचे सर्व प्रस्ताव मंजूर करून जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना सत्तार यांनी बैठकीत दिल्या.

तसेच आदर्श बँक प्रकरणातील ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी फास्टट्रॅक वर मोहीम राबवावी व आदर्श बँकेच्या मालमत्त्तांची विक्री करून टप्प्याटप्प्यात खातेदारांना त्यांची मूळ मुद्दल रक्कम उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयाला सत्तार यांनी दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com