Kirit Somaiya In Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Kirit Somiaya On Bangladeshi : तर सिल्लोड घुसखोरांचे मुख्य केंद्र बनले; किरीट सोमय्या यांनी घेतली आयजी, एसपींची भेट

BJP leader Kirit Somaiya alleges Sillod Taluka has become a major hub of corruption. : आज जर आपण दुर्लक्ष केलं, तर उद्या सिल्लोड तालुका घुसखोरांचं मुख्य केंद्र बनेल. मूळ नागरिकांना आपली जमीन, आपला गाव सोडावा लागेल, भयंकर दुष्परिणाम होतील.

Jagdish Pansare

BJP Political News : बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्यांना बोगस कागदपत्रांच्या आधारे रहिवासी प्रमाणपत्र वाटपाच्या विरोधात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये लाखो घुसखोर असल्याचा दावा पुराव्यासह सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भातील कागदपत्रं, पुरावे संबंधित जिल्ह्यात जाऊन ते जिल्हा प्रशासन, पोलिसांना देत दोषींवर कारवाईची मागणी करत आहेत. सिल्लोड तालुका सोमय्या यांच्या निशाण्यावर आहे.

चार हजाराहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना एसडीएम लतिफ पठाण यांनी राजकीय दबावापोटी बोगस रहिवासी प्रमाणपत्रांचे वाटप केल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. यासाठी दोन महिन्यात चारवेळा सिल्लोडचा दौरा करत दीडशेहून अधिक पुरावे उपविभागीय अधिकारी, पोलीस, सिल्लोड नगरपरिषदेच्या (Sillod City Council) मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोमय्या यांनी सादर केले. तसेच लतिफ पठाण यांना निलंबित करण्याची मागणी केली. वेळीच कारवाई झाली नाही, तर सिल्लोड तालुका घुसखोरांचे प्रमुख केंद्र बनेल, असा इशाराही देण्यात येत आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महसूल प्रशासनावर दबाव आणत आहेत, असा आरोप करत संघटनांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सिल्लोड तालुक्यात बोगस जन्म नोंदणी करून हजारो बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी रहिवासी प्रमाणपत्र मिळवले, शासकीय सुविधा घेतल्या.

मतदार यादीत नावं नोंदवून लोकशाही व्यवस्थेलाच सुरुंग लावला आणि याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिसून आला अस म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. या गंभीर प्रकरणावर किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला आहे. दोषींवर कारवाई आणि बोगस कागदपत्रांची तपासणी व्हावी, ही मागणी रास्त आहे. मतदार संघातील सर्व सामान्य जनता त्यांच्या सोबत आहे.

परंतु महसूल कर्मचारी आंदोलनाचा इशारा देत आहेत – ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. हा मुद्दा केवळ सिल्लोडपुरता मर्यादित नसून संपूर्ण तालुक्यासह देशाच्या सुरक्षेशी निगडीत आहे. आज जर आपण दुर्लक्ष केलं, तर उद्या सिल्लोड तालुका घुसखोरांचं मुख्य केंद्र बनेल. मूळ नागरिकांना आपली जमीन, आपला गाव सोडावा लागेल, भयंकर दुष्परिणाम होतील. याचा फायदा ज्यांनी हे ठरवून केलेले षडयंत्र आहे त्यांना होत आला आहे आणि भविष्यात सुद्धा होईल, अशा इशारा भाजपाचे तालुक्यातील नेते सुरेश बनकर यांनी दिला.

महसूल कर्मचाऱ्यांनी विरोध न करता, सिल्लोड तालुक्या असे आवाहन बनकर यांनी केले. दरम्यान, याच मुद्यावर छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र तसेच पोलीस अधीक्षक ग्रामीण विनय राठोड यांची किरीट सोमय्या , सुरेश बनकर, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर पाटील मोठे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मकरंद बापु कोरडे, भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारिया, नगरसेवक मनोज आण्णा मोरूल्लु यांनी भेट घेतली.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT