Sillod Political News : शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालण्यासाठी क्रेन दिला नाही; नगरपरिषदे विरोधात शिवप्रेमींचा संताप!

Shiv Premi expresses anger over the functioning of the Sillod Municipal Council led by MLA Abdul Sattar. : अखेर दोन तासांनी महावितरण कंपनीने शिडी उपलब्ध करून दिली. त्यावरून शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून जयघोष करण्यात आला.
Sillod Political News
Sillod Political NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP News : छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती काल राज्यात उत्साहात साजरी झाली. भगवेमय वातावरण अन् शिवरायांच्या गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेले होते. सिल्लोमध्ये मात्र शिवजयंती उत्सवात नगरपरिषदेच्या आडमुठेपणामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. आमदार अब्दुल सत्तार यांची सत्ता असलेल्या नगरपरिषदेने शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार घालण्यासाठी क्रेन उपलब्ध करून दिले नाही, असा आरोप भाजपाचे सुरेश बनकर व इतर पदाधिकारी, शिवप्रेमींनी केला.

एवढेच नाही तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी क्रेन उपलब्ध होत नाही तोपर्यंत मिरवणूक पुढे सरकणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवप्रेमींनी घेतली आणि तब्बल दोन तास रस्त्यावरच ठिय्या दिला. (BJP) यामुळे तणावाचे वातावरण तयार झाले आणि पोलीस प्रशासनावरचा ताणही वाढला. नगरपरिषदेच्या दुटप्पी भूमिकेमुळे सुरेश बनकर, कटारिया व इतर भाजपाचे पदाधिकारी आक्रमक झाले होते.

अखेर दोन तासांनी महावितरण कंपनीने शिडी उपलब्ध करून दिली. त्यावरून शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून जयघोष करण्यात आला. सिल्लोड शहरात शिवजयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मात्र, या उत्सवात (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या सूडाच्या राजकारणाने तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली.

Sillod Political News
Abdul Sattar V/S Raosaheb Danve : अब्दुल सत्तार म्हणतात, रावसाहेब दानवेंनी माझी तक्रार शिंदे-फडणवीसांकडे करावी, तिथेच सोक्षमोक्ष लावू!

शहरातील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सिल्लोड न.प. चे सार्वजनिक मालमत्ता असलेले क्रेन उपलब्ध करून देण्यास नगरपरिषदेने टाळाटाळ केली. हा प्रकार शिवभक्तांच्या भावनांवर आघात करणारा असून, प्रशासनाचा हिंदू सणावरील दुटप्पीपणा स्पष्ट करणारा आहे. शिवजयंतीच्या पवित्र सोहळ्यात नगरपरिषदेच्या या दडपशाहीला विरोध म्हणून आम्ही शिवप्रेमींनी तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करून अन्यायाविरोधात आवाज उठवला.

Sillod Political News
Sillod Assembly Constituency Result News : सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तारच, पण बनकरांनी त्यांना घाम फोडला!

यानंतर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने महावितरणकडून शिडीची व्यवस्था करण्यात आली आणि अखेर समस्त शिवभक्तांनी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. हा संपूर्ण प्रकार संतापजनक, लज्जास्पद आणि हिंदू समाजाच्या भावनांशी खेळणारा आहे. सिल्लोड नगरपरिषदेकडून वारंवार हिंदू समाजाच्या संबंधित कार्यक्रमांना अडथळा आणला जातो. हा संकुचित दृष्टिकोन खपवून घेतला जाणार नाही. नगरपरिषदेला लवकरच याचा जाब विचारला जाईल! हिंदू समाजावर अन्याय सहन केला जाणार नाही, याची नगरपरिषदेने नोंद घ्यावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा सुरेश पांडुरंग बनकर यांनी यावेळी दिला.

Sillod Political News
BJP New President: भाजपच्या गोटातून मोठी बातमी: राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नड्डांनंतर 'हा' चेहरा, मोदी-शाहांनी दिले संकेत?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढलेले सुरेश बनकर आणि विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्यात काँटे की टक्कर झाली होती. अवघ्या 2420 मतांनी सत्तार विजयी झाले. त्यानंतर नुकताच बनकर यांनी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश केला. निवडणूक निकालानंतर सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार विरुद्ध भाजपा असा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com