BJP News : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांच्या विरोधातील मोहिम तेज केली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुराव्याच्या फाईली घेऊन सोमय्या राज्यभर फिरत आहेत. मराठवाड्यातील सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात सर्वाधिक बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचा दावा करत सोमय्या यांनी तिसऱ्यांदा या तालुक्याचा दौरा केला.
शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा हा मतदारसंघ असून केवळ आधार कार्डचा पुरावा ग्राह्य धरून शेकडो लोकांना बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचे पुरावे यापुर्वीच्या दोन्ही दौऱ्यात सोमय्या यांनी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच शहर पोलीसांना दिले होते. तसेच या संदर्भात तक्रार देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली होती.
त्यानंतर 13 मार्च रोजी पुन्हा किरीट सोमय्या (Kirit Somayia) यांनी पुन्हा सिल्लोडचा दौरा करत पोलीस आणि उपविभागीय कार्यालयाला भेट देत कारवाई संदर्भात आढावा घेतला. त्यांच्यासोबत सुरेश बनकर व भाजपाचे इतर पदाधिकीरा उपस्थित होते. लतीफ पठाण यांनी या सगळ्या बोगस जन्म प्रमाणपत्र व त्याच्या अर्जांकजडे दुर्लक्ष केले. आधार कार्ड हा पुरावा मानला जाऊ नये, असे स्पष्ट आदेश असताना केवळ त्या आधारे जन्म प्रमाणपत्रांचे वाटप केले.
या संपूर्ण प्रकरणात उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्यावरही कारवाई करावी आणि त्यांना सह आरोपी करावे, अशी मागणी किरीट समोय्या यांनी केली. यापुर्वीच सोमय्या यांनी लतीफ पठाण यांना निलंबित करावे, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.
सिल्लोडमध्ये बांगलादेशी घुसखोरांना बनावट प्रमाणपत्रे देण्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. या षडयंत्रात उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, सिल्लोड नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी आणि इतर शासकीय अधिकारी सामील आहे. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी, यावेळी करण्यात आली. दरम्यान,सोमय्या यांनी तीनवेळा सिल्लोडचा दौरा केला, गंभीर आरोप केले, मात्र यावर अब्दुल सत्तार यांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.