Jalna BLO negligence case : लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्या, वादाचा विषय ठरला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांसाठी स्पेशल इंटेन्स रिव्हिजन (एसआयआर) अर्थात 'विशेष सखोल फेरतपासणी' सुरू केली आहे.
महाराष्ट्रात देखील तशी मोहीम सुरू आहे. परंतु या कामात हलगर्जीपणा, टाळाटाळ करणाऱ्या दहा बीएलओंवर जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
जालना (Jalna) तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार विष्णूपंत घुगे यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत, पोलिसांनी थखेट गुन्हा नोंदवल्याने खळबळ उडाली आहे. केलेल्या कामाची पडताळणीसाठी, हजर राहण्याचे वारंवार आदेश देऊनही हजर न झाल्यावरून, टाळाटाळ केल्यावरून, ही तक्रार झाली आहे.
मतदार यादीतील (Voter List) अस्पष्ट आणि विहीत आकार नसलेल्या छायाचित्राची पडताळणीच्या कामासाठी रूजू होण्याचा आदेश या दहा बीएलओंना दिले होते. वारंवार सूचना देऊन देखील जर न झाल्याने तसेच कामात टाळाटाळ केल्याने पोलिसांकडे तक्रार करावी लागल्याचे प्रशासकीय निर्णयावरून नायब तहसीलदार विष्णूपंत घुगे यांच्या फिर्याद दिली.
रमेश कल्याण खरे (कनिष्ठ लिपिक, जिल्हा जल संधारण अधिकारी), पुरुषोत्तम संपतराव चौरे (शांतिनिकेतन विद्यामंदीर, संभाजीनगर, जालना), एस. पी. लगड (जैन विद्यालय, जालना ), एस. एल. गुंजकर (जैन विद्यालय, जालना), शिवाजी गोविंदराव घोगरे (अहिल्यादेवी प्रशाला, जालना ), सचिन दामोदर खंदारे (आदर्श बालविकास प्रशाला, जालना ), एस. एस. गोसावी (लिपिक, कार्यकारी अभियता पाटबंधारे विभाग, जालना), अतीक रहीम शेख (लिपिक महापालिका, जालना), भरत सोपानराव होनमाने (कनिष्ठ लिपिक, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे) आणि केंद्रस्तरीय विभा अधिकारी संजय शंकरराव चव्हाण (लिपिक, पंचायत समिती कार्यालय, जालना) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिंग बूथ लेव्हल ऑफिसर हे मतदारांच्या घरी जातात. तिथे ते ओळखपत्रं आणि मतदान कार्ड क्रमांकाची माहिती गोळा करतात. नवीन मतदारांचा समावेश करून घेण्यासाठी फॉर्म-6 आणि घोषणापत्रं गोळा करतील आणि त्यांची जुळवणी किंवा लिंकिंग करण्यात मदत करतील. मतदारांना त्यांचा नोंदणी फॉर्म (ईएफ) भरण्यास मदत करतील. प्रत्येक मतदाराच्या घरी किमान तीन वेळा भेट देतील. मतदार ईएफ फॉर्म ऑनलाइन देखील भरू शकतात.
महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटकसह 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मतदारयाद्यांच्या 'विशेष सखोल फेरतपासणी' (SIR) मोहिमेची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, चंदिगड, दादरा-नगर हवेली, दमण- दीव, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, लडाख, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, दिल्ली, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, त्रिपुरा, तेलंगण आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.