Shripad Chindam : हकालपट्टी की राजकारण? छिंदमचा आरोप; “माझ्या जीवाला धोका, आमदार जबाबदार!”

BSP corporator Shripad Chindam alleges threat to life from NCP MLA Sangram Jagtap and Ajit Pawar faction corporators after being expelled from the Ahilyanagar municipal budget meeting : अहिल्यानगर महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेतून बसपाचे नगरसेवक शिवद्रोही श्रीपाद छिंदम यांची सभागृहातून हकालपट्टी करण्यात आल्याने वाद चिघळला आहे.
BSP corporator Shripad Chindam
BSP corporator Shripad ChindamSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar controversy : भाजपकडून उपमहापौर पदावर असताना, श्रीपाद छिंदम याने फेब्रुवारी 2018 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजा यांच्याविषयी अवमानकारक विधान केले होते. यानंतरही आताच्या महापालिका निवडणुकीत पुन्हा निवडून येत सभागृहात दाखल झाला आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेतून छिंदम याची पुन्हा हकालपट्टी करण्यात आली. शिवद्रोहीबरोबर आम्ही बसणार नाही, सभेचं कामकाज चालू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका सत्ताधारी नगरसेवकांनी घेत, छिंदम याला सभागृहातून बाहेर काढले.

श्रीपाद छिंदम हा या प्रकारावर आक्रमक झाले आहे. तो म्हणाला, 'सत्ताधाऱ्यांनी हा प्रकार लोकशाहीविरोधात केला आहे. यामागे राजकारण आहे. यातून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून, पुढे काही बरे-वाईट झाल्यास, आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे समर्थक नगरसेवक जबाबदार असतील,' असे म्हटलं.

महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत, काल शुक्रवारी बसपाचा (BSP) शिवद्रोही नगरसेवक श्रीपाद छिंदम सभागृहात बोलण्यासाठी उभा राहताच, सत्ताधारी नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. प्रचंड गोंधळ झाला. सत्ताधारी नगरसेवकांनी त्याच्या स्थानाजवळ धाव घेत, त्याने अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी आलेले कागदपत्रांची फेकाफेक केली. स्थानकावरील माईक उचकटून फेकून दिला.

सभागृहातील आरडाओरडानंतर श्रीपाद छिंदम हा सभागृहाबाहेर बाहेर काढले. यानंतर श्रीपाद छिंदम याने अप्पर पोलिस अधीक्षकांची भेट घेत, झालेल्या प्रकाराची माहिती देत, संरक्षण मागितले. श्रीपाद छिंदम याने काही नगरसेवकांची नावे घेतली. तसंच अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांचं नाव घेत, आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं.

BSP corporator Shripad Chindam
Rupali Chakankar Pressure Allegations : 'बिंग' फुटणार? अशोक खरात सावध; चाकणकरांचा पोलिसांवर थयथयाट? सर्व काही आलं समोर...

श्रीपाद छिंदम म्हणाला, "अर्थसंकल्पीय सभेत चर्चा करत असताना, प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांना काही प्रश्न केला. परंतु सभागृहातील काही नगरसेवकांनी लोकशाहीची गळपेची केली. सभागृहात अचानक तब्बल 15 नगरसेवक माझ्याविरोधात उभे राहिले अन् मला हाणामारीची भूमिका घेतली."

BSP corporator Shripad Chindam
Rupali Chakankar Controversy : शिक्षिकेवर हल्ला, शेकडो युवक भोंदूगिरीच्या विळख्यात; रूपाली चाकणकरांचा 'बुवा-बाबा संरक्षण आयोग' रंजना गवांदेंकडून एक्सपोज!

हे नगरसेवक जबाबदार

'नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी माझ्या आसनाजवळ येत, माईक उचकटला, अन् मला मारण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक मयूर बांगरे, अमोल येवले यांनी माझ्याविरोधात भूमिका घेताना, सभागृहात बसू देणार नसल्याचे विधान केलं. नगरसेवक गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक पटारे हे देखील त्यात सहभागी होते,' असे छिंदम याने म्हटलं.

राजकीय कटकारस्थान

'मी माझ्या प्रभागात चार नगरसेवकांपैकी सर्वाधिक तीन हजार मतांच्या फरकांनी विजयी झालेलो आहे. लोकांच्या मतावर निवडून आलो आहे, अर्थसंकल्पीय सभेत मला देखील लोकांचे प्रतिनिधीत्व करताना, चर्चेत सहभागी होण्याचा अधिकार आहे. असे असताना सभागृहातून बाहेर काढताना, मला ठार मारण्याच्या धमक्या नगरसेवकांनी दिल्या. हे सर्व कटकारस्थान आहे. राजकीय कटाचा यामागे वास येतो. यामध्ये नगरसेवक विकी जगताप होते' असाही दावा छिंदम याने केला.

...तर आमदार जगताप जबाबदार!

'या नगरसेवकांचे नेते, आमदार संग्राम जगताप यांचा हात यामागे आहे. माझ्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास, आमदार जगताप आणि त्यांचे सहकारी नगरसेवक हे जबाबदारी असतील. 52 नगरसेवकांपैकी 15 नगरसेवक कोणत्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतात, हे नगरकरांना माहिती आहे. या घटनेबाबत आपण रितसर गुन्हा नोंदवणार असल्याचा,' छिंदम याने म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com