Beed Murder Case News Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder case : एसआयटीचे पथक ॲक्शन मोडवर; केजमध्ये दाखल होताच उचलले मोठे पाऊल

SIT team action mode : संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी गुरुवारी एसआयटीचे पथक केजमध्ये दाखल झाले. पथकाचे प्रमुख बसवराज तेली यांनी केजमध्ये पोहचल्यानंतर लगेचच तपासाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

सरकारनामा ब्युरो

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यांनतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेला २४ दिवस पूर्ण झाले असले तरी फरार आरोपीना ताब्यात घेतलेले नाही. या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिकी कराड मंगळवारी पुण्यात शरण आल्यानंतर त्याची रवानगी 15 दिवसाच्या कोठडीत करण्यात आली. त्यातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी गुरुवारी एसआयटीचे पथक केजमध्ये दाखल झाले. पथकाचे प्रमुख बसवराज तेली यांनी केजमध्ये पोहचल्यानंतर लगेचच तपासाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याचे व एसआयटीची स्थापन करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून (CID) सुरु आहे. त्यातच आता बुधवारी या प्रकरणी राज्य सरकरकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीकडून करण्यात येणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुरुवारी एसआयटीचे (SIT) पथक केजमध्ये दाखल झाले आहे. पथकाचे प्रमुख बसवराज तेली हे केजला पोहोचले असून ते या ठिकाणी सुरु असलेल्या तपासाचा आढावा घेणार आहेत. मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची तेली घेणार आहेत. दरम्यान धनंजय देशमुख व एसआयटीचे इतर अधिकारी यांच्यात केज येथील शासकीय विश्रामगृहात चर्चा सुरू आहे. धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांच्या हत्येची बसवराज तेली यांना माहिती देणार आहेत.

एसआयटी पथकामध्ये 'या' अधिकाऱ्यांचा समावेश

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व आयपीएस बसवराज तेली, पोलीस उपमहानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी पुणे यांच्याकडे असणार आहे. तर तेली यांच्या नेतृत्वाखालील या विशेष तपास पथकात पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे यांचा समावेश आहे

आतापर्यंत 150 जणांची चौकशी

दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत 150 जणांची चौकशी करण्यात आली आहे. सीआयडीकडून सध्या युद्धपातळीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन कोटींची खंडणी आणि हत्या या दोन्हींच्या संबंधाच्या अनुषंगाने तपास केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT