Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवी अपडेट; तपासाला येणार वेग, राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल

Politcal News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहातील चर्चेवेळी बोलताना संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी लवकरच राज्य सरकरकडून एसआयटी स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
Beed Murder Case News
Beed Murder Case NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. येत्या काळात या तपास कामाचा वेग वाढणार आहे. या प्रकरणावर सीआयडीच्या अनेक पथकांकडून पाठपुरावा केला जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहातील चर्चेवेळी बोलताना संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी लवकरच राज्य सरकरकडून एसआयटी स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार बुधवारी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या काळात या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे.

राज्य सरकारकडून चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि गुन्हे अन्वेषण पुणे विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे एसआयटीचे प्रमुख म्हणून काम करतील. त्यांच्या टीममध्ये गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उप अधीक्षकांचाही समावेश असेल. तसेच बहुतांशी सदस्य बीड जिल्ह्यात काम करणारे अधिकारी आहेत. एकूण नऊ पोलीस अधिकारी देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करतील. त्यामुळे आता येत्या काळात या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे.

Beed Murder Case News
Santosh Deshmukh Case : तपास चक्र फिरली! वाल्मिक कराड नंतर आता CID च्या रडारवर सुदर्शन घुले

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासाचा वेग वाढला आहे. या प्रकरणावर सीआयडीच्या अनेक पथकांकडून पाठपुरावा केला जात आहे. या हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने सीआयडीपुढे शरणागती पत्करली. त्यानंतर या प्रकरणात अनेक खुलासे होऊ लागले आहेत. कराडला १५ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Beed Murder Case News
Santosh Deshmukh Case : तपास चक्र फिरली! वाल्मिक कराड नंतर आता CID च्या रडारवर सुदर्शन घुले

दरम्यान, आता या प्रकरणाच्या तपासासासाठी राज्य सरकारकडून ठोस पावले उचली जात आहेत. या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींच्या गळ्याभोवतीचा फास आणखी आवळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Beed Murder Case News
Shivsena Ubt News : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का ! गंभीर आरोप करत, ठाकरेंच्या शिलेदारांनी पक्षाला केला जय महाराष्ट्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com