Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar criticized State Govt : तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा लोकांना अधिकार; अजित पवार स्पष्टचं बोलले...

Ajit Pawar News: छत्रपती संभाजीनगर येथे आज अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar On Farmers : समाजात तेढ निर्माण होणारे प्रकार वाढत आहेत. बेरोजगारी वाढत आहे, यातून तरुण आत्महत्येसारखे मार्ग स्वीकारत आहेत. तुम्ही राज्य सरकार कशासाठी आणल आहे. एकमेकांची उणीधुणी काढण्यासाठी आणलं आहे की लोकाभिमूख राज्य कारभार करण्यासाठी सरकार आणलं, राज्याची कायदा आणि सुव्यव्यवस्था व्यवस्थित राहिलेली नाही. याकडेही राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे. अजित पवार आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून याठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, आज राज्यात पोलीस यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास कमी पडत आहे. राेज वेगवेगळे प्रकार घडत आहे. अशा घटना थांबण्याचं नावही घेत नाहीत. यामुळे सहाजिकच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री कमी पडत असतील तर राज्यात त्यांचा लोकशाहीत त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार लोकांना, विरोधी पक्षांना आहेच.

'तुम्ही ७५ हजार जणांची भरती करणार, १० तास वीज देणार, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपये अनुदान देणार यातील कोणतही आश्वासन सरकारने पूर्ण केलं नाही. अवकाळी पावसामुळे खरीप, रब्बी पिकांचे शेतपिकांचे जे नुकसान झाले, त्याचे पंचनामे झाल्यावर मदत करण्यांच आश्वासन दिलं. पण मदत अद्याप मिळालेली नाही. परवा मी नंदुरबारला होतो, नागपूरला होतो, त्यानंतर अमळनेरला होतो, आज संभाजीनगर ला आहे. लोकांना विचारल्यावर लोक सांगतात, आम्हाला पैसे अद्याप मिळालेलेच नाही. याकडे अजित पवार यांनी लक्ष्य वेधलं.

दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला. पण त्या कार्यक्रमात ज्या महिलांना आणलं होतं. त्यांना काही वेगळचं कारण सांगून आणलं होतं. कार्यक्रम संपल्यानंतर मात्र आपल्याला काहीच मिळालं नाही. अशी तक्रार या महिलांनी केली. त्याच्या कार्यक्रमाला जर लोक आणले जात असतील तर त्यांना जो शब्द देऊन आणलं तो शब्द राज्य सरकारने पूर्ण केला पाहिजे. अशा पद्धतीने राज्याचा ढिसाळ कारभार सुरु आहे. बदल्यांच्या संदर्भात काय कारभार सुरु आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्रात असे प्रकार घडत आहेत. याची महाराष्ट्राला जबरदस्त किंमत मोजावी लागेलं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

अजित पवार म्हणाले की, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. असे विचारले असता, अजित पवार म्हणाले की, फक्त अब्दुल सत्तार यांच्यावरच नाही तर राज्य सरकारमधील पाच-सहा मंत्र्यांची प्रकरणे समोर येत आहेत. त्याबद्दल सरकारने कोणतीही भूमिका व्यक्त केलेली नाही. काही ठिकाणी धाडी टाकल्या जातात, त्या धाडी कायदेशीर आहेत की बेकायदेशीर आहेत हा पण संशोधनाचा भाग आहे. काही ठिकाणी तर यंत्रणांना तिथे धाड टाकण्याचा अधिकारच नव्हता. असंही लक्षात आलं आहे. कोणी सांगतय तो त्यांचा पीए होता. ते म्हणतात तो माझा पीए नाहीच असेही प्रकार तिथे घडत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT