Devendra Fadnavis News : फडणवीस साहेब आपले स्वागत आहे, पण पालकमंत्री देसाई यांना घेवून या...

Shambhuraj Desai News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कल्याणमध्ये सभेला उपस्थित राहणार आहेत.
Devendra Fadnavis News:
Devendra Fadnavis News: Sarkarnama
Published on
Updated on

Kalyan-Dombivali News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कल्याणमध्ये सभेला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये काँग्रेसच्या वतीने बॅनर लावण्यात आले असून यावर "मिसिंग पालकमंत्री" असे लिहीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना संदेश दिला आहे.

"देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब आपले ऐतिहासिक कल्याण नगरीत स्वागत...पण येताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांना आपल्या सोबत घेवून या...जेणेकरून भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांसोबत कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना देखील पालकमंत्री पहायला मिळतील. या बॅनर वरील संदेश साऱ्यांचेच लक्ष वेधत आहे.

Devendra Fadnavis News:
Solapur Politic's : मी लिहून देते, भाजपच्या लोकांना विमानसेवा सुरू करणं जमणार नाही; काडादींच्या भेटीनंतर प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

ऐतिहासिक कल्याण नगरीत सोमवारी 19 जूनला जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने लावलेले हे बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत. आजच शिवसेना शिंदे गटाचा मेळावा कल्याणमध्ये असून काही कामांचे लोकार्पण देखील होणार आहे. त्यातच शहरात रात्री हे बॅनर लागले असून ते शिंदे गटाला देखील आव्हान देणारे आहेत.

Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSarkarnama

शिवसेनेचे (Shivsena) पालकमंत्री शंभूराजे देसाई हे पालकमंत्री झाल्यापासून नागरिकांच्या भेटीला किती आले. ठाणे जिल्ह्यातील किती नागरिकांना आपले पालकमंत्री कोण आहेत हे माहीत आहे? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. नागरिकांना तरी आमचे पालकमंत्री समजू दे याच हेतूने कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसच्या वतीने बॅनर लावण्यात आल्याचे काँग्रेसच्या (Congress) वतीने सांगण्यात आले.

Devendra Fadnavis News:
Nagpur ZP News : ‘या’ मुद्द्यावर झाले सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत, अन् सीईओंसह अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी !

काय लिहलंय बॅनरवर...

देवेंद्र फडणवीस साहेब आपले ऐतिहासिक कल्याण नगरीत स्वागत आहे. आपल्या सरकारमध्ये सहभागी असलेले पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांना आपल्या सोबत घेऊन या जेणेकरून भाजप पदाधिकाऱ्यांसोबत कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना देखील पालकमंत्री बघायला मिळेल MISSING माननीय श्री शंभूराज देसाई पालकमंत्री ठाणे जिल्हा, यांना आपण पाहिलं का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com