Deshmukh's criticism of Patole : डॉ. आशिष देशमुखांनी जाता-जाताही नाना पटोलेंना सोडले नाही, म्हणाले...

Dr. Ashish Deshmukh : कार्यकर्ता म्हणून काम करावे लागले, तरीही मी ते आनंदाने करेन
Dr. Ashish Deshmukh and Nana Patole
Dr. Ashish Deshmukh and Nana PatoleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Tomorrow Dr. Deshmukh will join the Bharatiya Janata Party : भारतीय जनता पक्ष माझ्या बाबतीत जी काही भूमिका घेईल, ती मला मान्य राहील. अगदी कार्यकर्ता म्हणून काम करावे लागले, तरीही मी ओबीसींसाठी आणि विदर्भासाठी ते आनंदाने करेन, असे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख म्हणाले. (Dr. Ashish Deshmukh met Union Minister Nitin Gadkari)

उद्या (ता. १८) डॉ. देशमुख भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. यापूर्वी आज (ता. १७) सकाळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, श्रद्धा आणि सबुरीने माझी पुढची राजकीय वाटचाल व्हावी, असा आशीर्वाद मी शिर्डीतून घेऊन आलो आहे आणि वाटचाल तशीच होईल, असे बळ आज नितीन गडकरी यांनी मला दिले आहे.

माझी राजकीय वाटचाल कुण्या एका मतदारसंघापुरती मर्यादित यापूर्वीही नव्हती आणि भविष्यातही नसणार आहे. विदर्भाचे व्यापक हित व्हावे, ओबीसींचे कल्याण व्हावे यासाठीच माझी पुढची राजकीय वाटचाल असणार आहे. कॉंग्रेसच्या विद्यमान प्रदेशाध्यक्षांबद्दल कॉंग्रेसजनांमध्ये मोठी नाराजी आहे, आक्रोश आहे.

हीच नाराजी मी वारंवार जाहीर करत होतो. विदर्भासह महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल नाराजी आहे. यासंदर्भातील अंतिम निकाल दिल्लीतील श्रेष्ठी देतील. मी आता कॉंग्रेसमध्ये नाही, त्यामुळे या विषयावर अधिक बोलणार नाही, असे डॉ. देशमुख म्हणाले. डॉ. देशमुख उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पण जाता-जाताही त्यांनी नाना पटोलेंवर शरसंधान साधण्याची संधी सोडली नाही.

Dr. Ashish Deshmukh and Nana Patole
Ashish Deshmukh यांना इतकी भारी ऑफर कशी मिळाली | KCR | Congress | Vidarbha

जनतेसोबत असलेली नाळ अधिक घट्ट करण्यासाठी जनतेमध्ये लवकरच जाणार असल्याचेही ते म्हणाले. उपमुख्यमन्त्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

आशिष देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करत होते. त्यामुळे त्यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने त्यांची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी केली आहे.

Dr. Ashish Deshmukh and Nana Patole
Dr. Ashish Deshmukh News : डॉ. आशिष देशमुख वेगळी वाट निवडताहेत, पण असणार 'ही' आव्हाने !

आता डॉ. देशमुख (Dr. Ashish Deshmukh) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपची (BJP) ताकत निश्‍चितच वाढणार आहे. २०१४मध्ये ते भाजपच्या तिकीटावर काटोल विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते.

यावेळी ते काटोल किंवा सावनेरमधूनही लढू शकतात. कारण सावनेरमध्ये सुनील केदार (Sunil Kedar) यांना टक्कर देणारा चेहरा आज तरी भाजपकडे नाही आणि आशिष देशमुख तेथे तगडी टक्कर देऊ शकतात. सावनेरमध्ये लढणारा एक योद्धा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.