Somnath Suryawanshi News Sarkarnama
मराठवाडा

Somnath Suryawanshi News : मृत सोमनाथ सूर्यवंशीचा 'पीएम' रिपोर्ट आला..

Somnath Suryavanshi's postmortem report has come : छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली त्याचे शवविच्छेदन आज करण्यात आले. पोस्टमार्टमच्या प्राथमिक अहवालानूसार सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या आहेत.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : परभणी (Parbhani) हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा काल (ता. 15) रोजी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परभणीतील शांत झालेले वातावरण पुन्हा तापले होते. दरम्यान, सूर्यवंशी याला पोलीसांकडून मारहाण झाल्याचा आरोप विविध संघटनांनी केला होता. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचे पोस्टमार्टम इन कॅमेरा फाॅरेन्सीकच्या देखरेखीखाली केले जावे, अशी मागणी करण्यात आली होती.

त्यानूसार छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली त्याचे शवविच्छेदन आज करण्यात आले. पोस्टमार्टमच्या प्राथमिक अहवालानूसार सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूचे कारण 'Shock following multiple injuries'असे नमूद करण्यात आले आहे. मारहाणीच्या जखमा सूर्यवंशी यांच्या अंगावर आढळून आल्या आहेत.

पोलीसांनी सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला होता. तर आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी हा दावा फेटाळून लावत पोलीसांच्या मारहाणीमुळेच सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. आता 'पीएम' रिपोर्टमध्ये सूर्यवंशी याच्या अंगावर मारहाणीच्या अनेक जखमा आढळून आल्याचे समोर आले आहे.

आजपासून नागपूरात सुरू झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील दोन्ही सभागृहात परभणी येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीच्या पेटीची काच फोडल्याचे व त्यानंतर उसळलेल्या दंगलीचा मुद्दा उपस्थितीत करण्यात आला होता.

तसेच दंगल प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या व मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी सभागृहात केली होती. त्यातच आता सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आल्याने हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT