Parbhani Riot News : माथेफिरूकडून संविधान प्रतिकृतीची विटंबना, परभणीत दंगल उसळली!

Desecration of a replica of the Constitution : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या स्टेशनरोड, गुजरीबाजार, अष्टभुजा देवी चौक, गांधी पार्क, शिवाजी चौक या भागासह जिंतूररोड, वसमत रोड या भागातील वाहनांना टार्गेट करत तोडफोड करण्यात आली.
Parbhani Riot
Parbhani RiotSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News: परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाचा प्रतिकृती काचेच्या पेटीत तयार करण्यात आलेली आहे. या प्रतिकृतीची काच सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फोडली. हा प्रकार लक्षात येताच संतप्त जमावाने या व्यक्तीला बेदम मारहाण केली.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या व्यक्तीच्या जमावाच्या तावडीतून सुटका करत त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सदर व्यक्तीचे नाव सोपान दत्तराव पवार (45) असून तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले आहे. (Parbhani) दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद परभणी शहरात उमटले. बाजारपेठेत दुकानावंर दगडफेक करत रस्त्यावरील वाहनांची नासधूस शेकडोच्या जमावकडून करण्यात आली.

Parbhani Riot
Beed Crime News : सरपंच देशमुख खून प्रकरणी जरांगे पाटलांची मध्यस्थी, पोलिसांकडून ठोस आश्वासनं अन् 26 तासांनी 'पोस्टमार्टेम'

जिल्हाधिकारी कार्यालय तसेच रेल्वेस्टेशन परिसरात रास्ता रोकोही करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आज परभणीसह गंगाखेडमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. (Marathwada) या दरम्यान परभणी शहरात ठिकठिकाणी दगडफेक आणि वाहनांच्या जाळपोळीचा प्रकार घडल्याची माहिती आहे. पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त तैनात केला असून शहरात तणावाचे वातावरण आहे.

Parbhani Riot
Marathwada Assembly Election : ईव्हीएमवर भरवसा नाय काय ? मराठवाड्यातून फेरमतमोजणीसाठी नऊ जणांचे अर्ज

काल संतप्त जमावाने रेल्वेस्टेशन मध्ये घुसून नंदीग्राम एक्स्प्रेस काही काळ रोखली होती. पोलिसांनी या जमावाला बळाचा वापर करत बाहेर काढले. दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले असले तरी आज बंद दरम्यान परभणीत दंगल उसळल्याचे चित्र आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील प्रतिकात्मक संविधानाच्या अवमानाची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती.

Parbhani Riot
Beed Murder Case News : मस्साजोग सरपंच खून प्रकरण; पंकजा मुंडे 'मोठा मुद्दा' घेऊन CM फडणवीसांना भेटणार

त्या घटनेचे पडसाद बुधवारी (ता.11) दुपारपासून शहरात उमटायला सुरुवात झाली. मंगळवारी रात्रीपासूनच शहरात अघोषित बंद पाळण्यात आला होता. बुधवारी या घटनेच्या निषेधार्थ शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंदच ठेवली. परंतू दुपारी 12 नंतर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जमाव जमण्यास सुरुवात झाली.

Parbhani Riot
Beed Murder Case News : सरपंच देशमुख खुन प्रकरणी दोघांना अटक, फरार आरोपींच्या शोधासाठी सहा पथके

हळूहळू जमाव शहरात दगडफेक करत फिरत होता. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या स्टेशनरोड, गुजरीबाजार, अष्टभुजा देवी चौक, गांधी पार्क, शिवाजी चौक या भागासह जिंतूररोड, वसमत रोड या भागातील वाहनांना टार्गेट करत तोडफोड करण्यात आली. रस्त्यावर उभी असणारी अनेक वाहने पेटवून देण्यात आली. काही भागात पोलिसांवरही दगडफेकीच्या घटना घडल्या. स्टेशनरोडवरील विसावा चौक येथील एक दुकान पेटवून देण्यात आले. दुकानावरील पाट्या फोडण्यात आल्या. यामुळे शहरातील वातावरण अशांत बनले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com