Parbhnai Riot News Update : परभणी दंगल प्रकरणी अटकेत तरुणाचा मृत्यू!

Youth dies while being arrested in Parbhani riot case : मयत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यु पोलिसांच्या मारहाणीतच झाला असा आमचा आरोप आहे. मयताची उत्तरीय तपासणी ही छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये करावी जेणे करून सत्य समोर येईल.
Parbhani Riot News
Parbhani Riot NewsSarkarnama
Published on
Updated on

गणशे पांडे

परभणी : संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अटक करण्यात आलेल्या एका युवकाचा (Parbhani) आज सकाळी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सोमनाथ सूर्यवंशी असे या मृत युवकाचे नाव आहे. हा युवक 11 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत होता. तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता.

युवकाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिथे मोठा जमाव जमला होता. (Marathwada) घटनास्थळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून जमावाच्या भावना चिघळू नयेत यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, शहरातील मुख्य बाजारपेठ काही अंशी खुली करण्यात आली असली तरी बहुतांश व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवणे पसंत केले.

Parbhani Riot News
Parbhani Violence : जिल्हाधिकारी कार्यालयातही तोडफोड; परभणीत जमावबंदीचे आदेश, इंटरनेटही बंद!

सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. घटनेचा तपास सुरू असून, युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत चौकशी सुरू आहे. शहरातील वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने सर्व नागरिकांना शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले. रविवार असल्याने सकाळी बाजारपेठ बंदच होती.

Parbhani Riot News
Parbhani Political News : 'देवाभाऊं'च्या दरबारात परभणीचा मंत्री दिसणार का?

मात्र, सकाळी 11 वाजल्यानंतर काही दुकाने उघडण्यात आली आणि मर्यादित स्वरूपात व्यवहार सुरू झाल्याचे दिसून आले. अनेक दुकानदारांनी परिस्थिती पाहून दुकान उघडण्याचे टाळले. घटनेनंतर शहरात पोलिस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला होता. तणावाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.

Parbhani Riot News
Parbhani Riot News : माथेफिरूकडून संविधान प्रतिकृतीची विटंबना, परभणीत दंगल उसळली!

घटनेनंतर विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. युवकाचा मृत्यू दुर्दैवी असून, त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे, डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबीरे, रवि सोनकांबळे, रणजित मकरंद, धम्मदीप रोडे, आशिष वाकोडे, आकाश लहाने आदी अनेक नेते जिल्हा रुग्णालयात तळ ठोकून होते.

Parbhani Riot News
Marathwada Assembly Election : ईव्हीएमवर भरवसा नाय काय ? मराठवाड्यातून फेरमतमोजणीसाठी नऊ जणांचे अर्ज

त्यांनी जमलेल्या जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. प्रभारी पोलिस अधिक्षक यशवंत काळे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्याशी त्यांनी चर्चा केली. मयत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील फॉरिन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी, न्यावा अशी मागणी या नेते मंडळींनी केली आहे. मयत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यु पोलिसांच्या मारहाणीतच झाला असा आमचा आरोप आहे. मयताची उत्तरीय तपासणी ही छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये करावी जेणे करून सत्य समोर येईल, असे विजय वाकोडे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com