Subhash Zambad Sarkarnama
मराठवाडा

Subhash Zambad : काँग्रेसच्या माजी आमदाराला न्यायालयाचा मोठा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Subhash Zambad and Ajantha Nagari Cooperative Bank : ...या प्रकरणात झांबड हे मुख्य आरोपी आहेत ; अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एम. जामदार यांनी जामीन फेटाळला आहे.

Jagdish Pansare

Former Congress MLA Subhash Zambad : अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या रकमेचा सुमारे ९७.४१ कोटींच्या अपहार प्रकरणात वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे. तेंव्हापासून पोलिसांना चकमा देणारे काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य तथा बँकेचे अध्यक्ष संशयीत सुभाष झांबड यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एम. जामदार यांनी फेटाळला. या प्रकरणात झांबड हे मुख्य आरोपी आहेत.

गतवर्षी १८ ऑक्टोबर २०२३ रोजी येथील सिटी चौक पोलिस(Police) ठाण्यात विशेष लेखा परिक्षण (सहकारी बँका) यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरून अजिंठा बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी, बँकेचे लेखा परिक्षण करणारे खासगी लेखा परीक्षक सतीश मोहरेंसह कर्मचारी व २००६ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीतील बँकेचे सर्व संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार नोंदवली होती.

त्यानुसार वरील आरोपींविरुद्ध अपहार, ठेवीदारांची फसवणूक, ३६ लोकांच्या बोगस ठेवी आणि त्यांना दिलेले कर्जही बोगस वाटप केल्याचे दाखवण्यात आले, आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे असून, बँकेचे सीईओ प्रदीप कुलकर्णी याला यापूर्वी अटक झालेली आहे.

कुलकर्णी याचाही अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने दोन वेळा आणि औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसचे(Congress) माजी आमदार सुभाष झांबड गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत आहे. त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज अखेर न्यायालयाने फेटाळला. झांबड यांच्यातर्फे ॲड. एस. जी. लड्डा, ठेवीदार मंगेश कपोते व इतरांकडून ॲड. विकास सुरेश तानवडे तर सरकारतर्फे एन. बी. धोंगाडे यांनी काम पाहिले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT