नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर जीवघेणा हल्ला Sarkarnama
मराठवाडा

Sukhabir Singh Badal: नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर जीवघेणा हल्ला! गुरुद्वारात जात असतानाच केला तलवारीनं वार

Sukhbir Singh Badal Sword Attack Nanded: शिरोमणी अकाली दल (बादल) या पक्षाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर महाराष्ट्रात हल्ला झाल्याचं वृत्त आहे.

Amit Ujagare

Sukhabir Singh Badal Attacked in Nanded: शिरोमणी अकाली दल (बादल) या पक्षाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर महाराष्ट्रात हल्ला झाल्याचं वृत्त आहे.

नांदेडच्या प्रसिद्ध गुरुद्वाराच्या प्रवेशद्वारावरच त्यांच्यावर हल्लेखोरानं तलवारीनं हल्ला केला. यामध्ये बादल जखमी झाले असून त्यांना नांदेडमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यावेली त्यांच्यासोबत लोकसभा खासदार हरसिमरत कौर बादल या देखील उपस्थित होत्या.

सुत्रांच्या माहितीनुसार, निहंग ग्रुपच्या सदस्यांनी सुखबिर सिंग बादल यांच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात बादल यांच्या हाताला जखम झाली आहे. गुरुद्वाराच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच आतमध्ये जात असताना गाडीतून उतरत असतानाच त्यांच्यावर हल्लेखोरांनी तलवारीनं हल्ला केला. पण त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकानं हा हल्ला यशस्वीरित्या रोखला, त्यामुळं यातून बादल थोडक्यात बचावले आहेत.

नांदेड पोलिसांच्या माहितीनुसार, सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला निहंग शिख समुदयाकडून करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या पत्नी आणि पंजाबच्या बठिंडा लोकसभा मतदारसंघातील खासदार हरसिमरत कौर या देखील उपस्थित होत्या. नांदेडमध्ये ऐतिहासिक गुरुद्वारे साहिब असून पंजाबसह देशभरातील शिख समुदाय या ठिकाणी आपल्या गुरुंच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात.

२०२४ मध्येही झाला होता हल्ला

सुखबीर सिंग बादल यांच्यावर २०२४ मध्ये देखील अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जीवघेणा हल्ला झाला होता. कट्टरवादी शिख संघटना बब्बर खालसा या संघटनेनं हा हल्ला केला होता. हल्लेखोरानं त्यांच्यावर गोळी झाडली होती, यावेळी देखील ते थोडक्यात बचावले होते.

पुन्हा एनडीएसोबत जाणार

शिरोमणी अकाली दल हा पक्ष यापूर्वी एनडीएमध्ये होता. पण २०२४ च्या निवडणुकीवेळी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील शेतकऱ्यांचा भाजपविरोधातील नाराजीचा सूर पाहता शिरोमणी अकाली दलानं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोमणी अकाली दल आणि भाजपची जवळीक वाढली असून सत्तेच्या गणितामुळं पुन्हा ते एनडीएत सामिल होण्याची चिन्ह आहेत. याचाच भाग म्हणून नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुखबीर सिंह बादल यांची संसद परिसरात भेट झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT