Sonali Gaikwad Death : मोशी कचरा दुर्घटनेतील मृत गणेश गायकवाडांच्या पत्नीचे टोकाचे पाऊल, जीवन संपवले!

PCMC Ganesh Gaikwad Wife : सोनाली गायकवाड यांनी गळफास घेत आपले आयुष्य संपवले. पतीच्या अपघाती निधनानंतर त्या मानसिक तणावात होत्या.
Sonali Gaikwad's tragic death has prompted an investigation into the circumstances surrounding the incident.
Sonali Gaikwad's tragic death has prompted an investigation into the circumstances surrounding the incident.sarkarnama
Published on
Updated on

PCMC News : एक महिन्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो दुर्घटना घडली होती. यामध्ये 9 जणांच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृत्यू झाला होता. यामध्ये मृत्यू झालेल्या नागेश गायकवाड यांच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आहे.

बुधवारी सोनाली गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वायसीएम रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी या घटनेची अकास्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती आहे.

नागेश यांच्या निधनानंतर सोनाली या तणावात होत्या. त्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी,असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली आहेत.बुधवारी रात्री सोनाली यांनी राहत्या घरात दुसऱ्या खोलीत गळफास घेतला.

Sonali Gaikwad's tragic death has prompted an investigation into the circumstances surrounding the incident.
Crime News : बदलापुरात रक्तरंजित थरार! गोळीबारात तरुणाचा मृत्यू, क्रिकेट टर्फवर सापडला रक्ताच्या थारोळ्यात; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

त्यांच्या मुली दुसऱ्या खोलीत होत्या. मुली रडत असल्याचे लक्षात आल्यानंतर सोनाली यांचे दीर यांनी सोनाली यांना आवाज दिला. मात्र, त्या कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी खोलीची दरवाजा उघडला. त्यावेळी सोनाली यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

8 जुलैला मोशीतील कचरा डोपमध्ये दुर्घटना घडली होती. त्यामध्ये गणेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोनाली या मानसिक तणावात होत्या असे सांगितले जात होते.

Sonali Gaikwad's tragic death has prompted an investigation into the circumstances surrounding the incident.
Kolhapur Murder: कोल्हापुरमधील महिला सरपंचाची अनैतिक संबंधातून हत्या; पंढरपूरच्या बहाण्याने नेवून काढला काटा : 40 वर्षीय प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com