Uday Samant : उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, मोठा अनर्थ टळला

Uday Samant Helicopter Technical Fault : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली असून योग्य वेळीच पायलटच्या लक्षात बिघाड आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Maharashtra Minister Uday Samant Helicopter Technical Problem
Maharashtra Minister Uday Samant Helicopter Technical Problemsarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली असून, शिंदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. ते हेलिकॉप्टरने नागपूरवरून गडचिरोलीकडे जाणार होते. पण उड्डाणादरम्यानच तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड पायलटच्या लक्षात येताच सतर्कता आणि प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द केले. यामुळे सामंत थोडक्यात बचावले असून मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सामंत हे गुरुवारी (ता. १३) सकाळी नागपूरवरून गडचिरोली येथे हेलिकॉप्टरने जाऊन सूरजागड येथे पाहणी दौरा करणार होते. या दौऱ्यासाठी निघण्याची तयारीही झाली होती.

पण हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड पायलटच्या लक्षात येताच तात्काळ उड्डाण रद्द केले गेले. यावेळी उदय सामंत यांच्यासोबत त्यांचे सुरक्षारक्षक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामुळे मोठा अनर्थ टळला.

Maharashtra Minister Uday Samant Helicopter Technical Problem
Uday Samant : राज्यात उद्योग येत असल्याचा गवगवा; प्रत्यक्षात 36 हजार कंपन्यांना टाळे, केंद्राच्या आकडेवारीवर सामंत म्हणाले, ‘एक दिवस द्या’

दरम्यान, नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, हेलिकॉप्टर उड्डाणापूर्वी तांत्रिक तपासणीत बिघाड लक्षात का आला नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्याची मागणी स्थानिक शिवसैनिकांनी केली आहे. तर या घटनेच्या वृत्ताला स्वतः उदय सामंत यांनी दुजोरा दिला आहे.

Maharashtra Minister Uday Samant Helicopter Technical Problem
Uday Samant Audio Clip : 'ब्लॅकमेलिंगचा नवा धंदा!' : भाजप आमदारावर गुन्हा दाखल करण्याचा शिवसेना मंत्र्याचा इशारा

या घटनेनंतर उदय सामंत यांनी मीडियाशी संवाद साधताना, हे वृत्त माध्यमांपर्यंत कसे पोहोचले माहीत नाही. पण ते खरं असून, सकाळी पावणे नऊ वाजता नागपूरहून सूरजागडच्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी मी निघालो होतो. यावेळी हेलिकॉप्टर सुरू केल्यानंतर उड्डाणादरम्यान बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. ज्यानंतर पायलटने धोक्याची घंटा ओळखून वेळीच तात्काळ उड्डाण रद्द केले. यामुळे बाय रोड गडचिरोलीला निघाल्याचे सामंत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com