Shivsena News : अजित पवारांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर 3 दिवसांतच राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांनी आज सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच महायुतीच्या सत्तेतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही भाष्य केले आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या पार्श्वभूमीवर 'राजकारणात, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली माणूस हरला, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
निश्चित काही कालावधी गेल्यानंतर या घडामोडी होणे साहजिक होते. परंतु इतक्या तातडीच्या हालचाली होणे धक्कादायक आहे. काल राख सावडण्याचा कार्यक्रम झाल्याबरोबर सुनेत्रा वहिनी मुंबईकडे जाणे इतर राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट देणे हे थोडंसं मनाला पटत नाही. परंतु हे राजकारण आहे, त्यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय आहे. तो का घेतला, कोणत्या परिस्थितीत आणि का घ्यावा लागला? हे सगळे जरी प्रश्नचिन्ह असले तरी अखेरला निर्णय हा झालेला आहे, असे शिरसाट म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलनीकरणाच्या चर्चा सुरू असताना आज सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यात आले. सुनेत्रा पवार शनिवारी मध्यरात्रीच मुंबईत दाखल झाल्या. आज दुपारी त्या विधान भवनातील पक्षाच्या बैठकीला उपस्थित होत्या. या वेगवान राजकीय घडामोडींवर सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष होते. शिवसेनाही या घडामोंडीवर बारकाईने लक्ष ठेवले होते.
या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना या सगळ्यावर आपले मत व्यक्त केले. सुनेत्रा वहिनी या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील त्यानंतरची काय परिस्थिती असेल किंवा त्याच्या पक्षाचं काय होणार आहे? राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आहे किंवा महाराष्ट्राचे अध्यक्षाचं काय? हे सगळं स्पष्ट होईल. परंतु ज्या काही घडामोडी सुरू आहेत, त्यावरून मला वाटतं राजकारणामध्ये खुर्ची जिंकली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, पण माणूस हरला आहे. सर्वसामान्य माणसाला या गोष्टी भावत नाहीत. शासकीय दुखवटा तीन दिवसाचा होता तो ही संपूर्ण झाला नाही. मला थोडा कालावधी गेला पाहिजे होता.
अर्थात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो काही निर्णय घेतला असता त्याला क्राँस करण्याची कुणाचीही ताकद नव्हती. कोणत्याही नेत्याची नव्हती. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रिकरणाच्या ज्या चर्चा दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये शरद पवार साहेबांशी जी काही चर्चा, बैठक झाली असे सांगितले जाते, तो निर्णय सर्वांनी मान्य केला असता. परंतु आता मला वाटतं परिस्थिती बदललेली आहे. आता सामूहिक निर्णयाचे एक नवीन वारं या राजकारणामध्ये चालेल. म्हणून कदाचित शरद पवार साहेबांनी आता याच्यात खंड पडेल, अशी शंका व्यक्त केली.
सध्या सुरू असलेल्या राजकारणातल्या घडामोडीमध्ये शरद पवारांना विचारले गेले नसावं. त्यांचे असलेले राजकीय सल्लागार, पक्षाचे नेते यांनीच ठरवून घेतलेला हा निर्णय असावा. त्यामुळे शरद पवारांना या संदर्भात कितपत माहिती आहे याबद्दल सांगता येणे आता शक्य नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी भूमिका या सगळ्या घडामोडीमध्ये घेतील तीच भूमिका आमची असणार आहे, असेही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
अजित दादांच्या पक्षाच्या आमदारांनी, मंत्र्यांनी तो निर्णय घ्यायचा आणि त्यांचा जो काही निर्णय असेल त्यांना आम्हाला पाठिंबा देणे गरजेचे होऊन जाईल. म्हणून त्यांनी काय निर्णय घेतला त्याला विरोध करण्याची आमची कोणतीही मानसिकता नाही, असेही संजय शिरसाट यांनी सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.