Suresh Billewad shiv sena sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan : काँग्रेसनेते अशोक चव्हाणांना धक्का! शिवसेनेत इनकमिंग...

Shiv Sena : माजी उपसभापतीने सोडली काँग्रेसची साथ, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण घेतले हाती.

Laxmikant Mule

Nanded : आमदार अपात्रतेच्यासंदर्भात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच निकाल दिला. हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागल्याने शिंदे गटात उत्साह आहे. आता खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, असे म्हणत इतर पक्षातील नाराजदेखील एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे दिसून येते आहे. आगामी काळात मोठे इनकमिंग शिवसेनेत (शिंदे गट) होण्याची शक्यता आहे. तसा दावादेखील शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहेत. या इनकमिंगची सुरुवात काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातून सुरू झाली आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड मानला जातो. या गडाला सुरुंग लावण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. काँग्रेसचे माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. भोकर तालुक्यात सुरेश बिल्लेवाड यांचा चांगला जनसंपर्क आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात पक्षप्रवेशाचे सोहळे वाढणार असून त्याची सुरुवात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातून झाली आहे. भोकर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळापूर येथे झालेल्या मेळाव्यात प्रवेश केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भोकर पंचायत समितीची २०१७ मध्ये झाली होती. या निवडणुकीत सुरेश बिल्लेवाड हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. काँग्रेसला आपला सभापती करण्यासाठी एका सदस्याची गरज होती. काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी बिल्लेवाड यांना सोबत घेऊन उपसभापतिपदी केले होते. ते काही वर्षें काँग्रेसमध्ये सक्रिय झाले होते.

काँग्रेसमध्ये कोंडमारा होत आहे, तसेच पक्षात डावलण्यात येत आहे, असा ठपका ठेवून सुरेश बिल्लेवाड यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

(Edited By Roshan More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT