Nanded Loksabha Constituency : अशोक चव्हाण इच्छुक नसल्याने नांदेडमध्ये काँग्रेसच्या गोटात शांतता...

Ashok Chavan News : गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस फारशी उत्सुक दिसत नाही.
Nanded Loksabha Constituency
Nanded Loksabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Nanded Congress News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष सक्षम उमेदवार शोधू लागला आहे. लोकसभा निवडणूक जिंकायची म्हटलं तर उमेदवार ताकदीचा हवा हे आलेच. (Nanded Loksabha Constituency) मराठवाड्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघातून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कोणाला मैदानात उतरवणार, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे एकमेव नाव पक्षासमोर असले तरी त्यांना मात्र लोकसभा लढवण्यात रस नसल्याचे सांगितले जाते.

Nanded Loksabha Constituency
Nanded Congress News : नांदेडची जागा भाजप जिंकू शकत नाही, म्हणून अशोक चव्हाणांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा...

आता नेताच तयार नाही, म्हटल्यावर पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये तरी उत्साह कसा असेल? त्यामुळे नांदेडमध्ये सध्या काँग्रेसच्या (Congress) गोटात शांतता आहे. (Ashok Chavan) अशोक चव्हाण यांची लोकसभा लढवण्याची इच्छा असो की नसो, पण सध्या तरी काँग्रेसपुढे दुसरा पर्याय नाही, ही वस्तुस्थिती आहे. नवीन वर्षात लोकसभेच्या निवडणुकीचा बार उडणार असून निवडणूक कार्यक्रम केव्हाही घोषित होऊ शकतो. हे गृहित धरून प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे.

पण गेल्या निवडणुकीच्या पराभवाचा अनुभव लक्षात घेता काँग्रेसची निवडणूक तयारी कासवगतीने सुरू आहे. काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर काही बदल केले आहेत. लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती लक्षात घेता प्रचारासाठी दिवस कमी पडतात. (Nanded) नांदेड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो. पण हा गड गेल्या निवडणुकीत ढासळला आणि भाजपने तो काँग्रेसकडून हिसकावला. गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस फारशी उत्सुक दिसत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेड जिल्ह्यात काँग्रेसच्या गोटात असलेली शांतता कदाचित त्यामुळेच असल्याचे बोलले जाते. देशात सध्या मोदीलाट असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही मोदीलाट होती, पण यावर स्वार होत अशोक चव्हाण यांनी तेव्हा विजय मिळवला होता. पण गेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांना ही किमया पुन्हा साधता आली नाही. त्यामुळे आता पुन्हा लोकसभेची परीक्षा नको, अशी त्यांची भूमिका असल्याचे बोलले जाते.

भाजपकडून मात्र प्रत्येक लोकसभा मतदारसंघांची रणनीती ठरवली गेली आहे. त्यानुसार बैठका, मेळावे घेतले जात आहेत. राज्यस्तरावरील नेत्यांच्या जिल्ह्यात चकरा वाढल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी बैठका घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लावले, तर खासदार प्रताप चिखलीकर यांनीही स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात मराठवाड्यातील ज्या काही जागा काँग्रेसला मिळतील, त्यात नांदेडचा समावेश असणार आहे. नागपूर येथे नुकताच काँग्रेस स्थापनादिन साजरा करण्यात आला. काँग्रेसने या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच फोडल्याचे बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

Nanded Loksabha Constituency
Nanded Loksabha Constituency : पुन्हा अशोक चव्हाण ? की काॅंग्रेस देणार नव्या चेहऱ्याला संधी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com