Suresh Dhas Devendra Fadnavis rashmi Shukla (1).jpg Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas : विरोधकांच्या नाकावर टिच्चून सुरेश धसांनी पुढचा डाव टाकलाच,CM फडणवीसांनंतर रश्मी शुक्लांची भेट; केली 'ही' मोठी मागणी

Suresh Dhas Meet Rashmi Shukla : संतोष देशमुखांची हत्या ही अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा प्लॅन पोलिसांचा होता असा आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीयांनी केला.त्याच आरोपांचा पुनरुच्चार करताना सुरेश धस म्हणाले,आरोपींना संतोष देशमुखांना उचलून कळंबला न्यायचं होतं.

Deepak Kulkarni

Mumbai News : बीड हत्येप्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा सरपंच संतोष देशमुख यांचे धनजंय देशमुख आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (ता.18) देशमुख कुटुंबीयांची मस्साजोग येथे जाऊन भेट घेतली. आता सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांना बदनाम करण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. त्यासाठी कळंबमध्ये एक बाईही तयार ठेवण्यात आल्याचा आरोप करुन भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पुन्हा एकदा मराठवाड्यासह बीडचं राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांनी मंगळवारी राज्याच्या महापोलिस संचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शुक्ला यांच्याकडे संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणांची चौकशी,बीडमधील राखेची अवैध वाहतूक आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्रिपद आणि गृहखातं ताब्यात असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर आता आमदार धस यांनी थेट राज्याच्या महापोलिस संचालक रश्मी शुक्ला यांचीच भेट घेतल्यानं पोलिसांसह तपास यंत्रणांवरचा दबाव वाढणार आहे.

आमदार धस यांनी मुंबईतील पोलिसांच्या विशेष पथकामार्फत देशमुख आणि मुंडे हत्या प्रकरणांची चौकशी करण्यात यावी असंही रश्मी शुक्ला यांच्याकडे मागणी केल्याचाही खुलासा पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे. यावेळी धस यांनी संतोष देशमुख हत्येनंतरचा आरोपींचा खळबळजनक प्लॅन उघड केला आहे.

संतोष देशमुखांची हत्या ही अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा प्लॅन पोलिसांचा होता असा आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीयांनी केला.त्याच आरोपांचा पुनरुच्चार करताना सुरेश धस म्हणाले,आरोपींना संतोष देशमुखांना उचलून कळंबला न्यायचं होतं.त्यांनी कळंबमध्ये एक महिलादेखील तयार ठेवली होती. तिच्यासोबत काहीतरी झटापट झाल्याचं भासवायचं होतं.

त्यानंतर या प्रकरणात संतोष देशमुखांना मारलं असा प्लॅन आरोपींनी रचला होता.पण त्या आधीच संतोष देशमुखांचा जीव गेला. त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा आरोपींचा प्लॅन अयशस्वी फसला, असंही धस यांनी म्हटलं. विधानसभेत पहिल्याच दिवशीच आपण ही गोष्ट सांगितली होती, असंही ते म्हणाले.

बीडमध्ये काही पोलिस अधिकारी हे 15-20 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्यासारख्या त्या अधिकाऱ्यांमुळेच जिल्ह्यात आर्थिक गैरव्यवहार केले जात आहे. तसेच गुन्हेगारांनाही पाठबळ मिळत आहे. त्यामुळे इतकी वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिसांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आपण शुक्ला यांच्याकडे केल्याचेही धसांनी सांगितले.

माझी मस्साजोगची लढाई शेवटपर्यंत लढण्याची तयारी आहे.तसेच मस्साजोगचे लोक आणि धनंजय देशमुख काय म्हणतात हे पाहा. त्यांचा आपल्यावर विश्वास आहे,आपण तसं काही करणार नाही हे नक्की असंही धसांनी विरोधकांना ठणकावले. तसेच त्यांनी यावेळी धनंजय मुंडेंसोबतची गुप्त भेट आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरही सुरेश धसांनी स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले, या प्रकरणात आपल्याला जाणून बुजून बदनाम केलं जात आहे.हे ज्यानं केलंय, त्या बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असं धक्कादायक विधान सुरेश धस म्हणाले. आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावल्यामुळेच आमची 20 ते 30 मिनिटे आमच्यात चर्चा झाली. ही वेळ रात्री 9.30 वाजताची होती. पण आपण त्याचवेळी हे प्रकरण मिटणार नसल्याचं स्पष्ट करत त्या बैठकीतून आपण उठून गेलो असंही त्यांनी म्हटलं.

तसेच फक्त बावनकुळे यांनी बोलण्याच्या ओघात साडेचार तास चर्चा झाल्याचं बोलले.ते तसे का बोलले हे त्यांनाच विचारावं. दुसऱ्यांदा भेटलो ते त्यांच्या आजारीपणाच्या वेळी. ते देखील माणुसकीच्या नात्याने भेटलो. या प्रकरणात माझ्यावर संशय घेण्याचा काही गरज नाही.असं सुरेश धस यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT