Suresh Dhas Gopinath Munde .jpg Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas On Gopinath Munde: 'गोपीनाथ मुंडेंनी मुंबईतलं टोळीयुध्द संपवलं,पण त्यांच्या घरातलं...'; सुरेश धसांचा खळबळजनक दावा

Santosh Deshmukh Murder Case : गोपीनाथ मुंडेसाहेबांचं असं राजकारण नव्हतं.परंतु, काही दुर्दैवी म्हणावं लागेल, घटना त्यांच्याही कालावधीत घडल्या.त्यांचा त्याला होकार नव्हता. संगीत दिघोळे किशोर फडचं प्रकरण असेल.पण ते

Deepak Kulkarni

Beed News : भाजप आमदार सुरेश धस यांनी गेल्या काही महिन्यांपासून बीडसह संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण तापवलं आहे.त्यांनी संतोष देशमुख प्रकरण उचलून धरतानाच बीडमधील भयावह गुन्हेगारी विश्वाचं चित्र राज्यासमोर आणलं होतं.तसेच माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधावरुनही गंभीर आरोप केले होते.याच सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आता भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि परळीतल्या गुन्हेगारीविषयी खळबळजनक दावा केला आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांनी सरकारनामाला विशेष मुलाखत दिली.या मुलाखतीत त्यांनी बीड जिल्हा,धनंजय मुंडे,पंकजा मुंडे,गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण,बीडमधील गुन्हेगारी यांसह संतोष देशमुख,बापू आंधळे, महादेव मुंडे हत्या प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं.

धस म्हणाले, गोपीनाथ मुंडेसाहेबांचं (Gopinath Munde) असं राजकारण नव्हतं.परंतु, काही दुर्दैवी म्हणावं लागेल, घटना त्यांच्याही कालावधीत घडल्या.त्यांचा त्याला होकार नव्हता. संगीत दिघोळे किशोर फडचं प्रकरण असेल.पण ते स्वत:कधीच यात जबाबदार नव्हते.किंवा त्यांना असं काही पटतही नव्हतं.मी नाव घेणार नाही,पण ती व्यक्ती त्याला जबाबदार होती.

गोपीनाथ मुंडेंनी मुंबईतील टोळीयुध्द संपवलं.त्याचा दि एंड केला.पण त्यांना त्यांच्या घरातलं टोळीयुध्द संपवता आलं नाही.हे टोळीयुध्दच होतं परळीतलं. एकीकडे वाल्मिक कराड आका,आणि दुसरीकडे बबन गित्ते. गित्तेला हे घाबरायचे. म्हणून त्याला खल्लास केल्याशिवाय चप्पल घालणार नाही असा पण केला होता. तर बबन गित्तेचा पण यांना खल्लास केल्याशिवाय दाढी काढणार नाही असा होता,एवढी मोठी दाढी हेही आम्हांला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षप्रवेशावेळी कळालं,असंही धस यांनी सांगितलं.

धस म्हणाले, मग काल घडलेलं बापू आंधळे प्रकरण असेल किंवा मग संतोष देशमुख. यानंतर त्यांना यांचीच गरजच राहिली नाही ना,कारण यांचे हवले दौलेच एवढे मोठे झाले की, ते जिल्ह्याचे बाप म्हणायला लागले.जिल्ह्याचे बाप म्हणण्याच्या नादातच हे कृत्य करुन बसले.आत्तापर्यंत परळी मतदारसंघात 12-13 मर्डर झाले, हे सगळे पॉलिटिकल होते, मी इतर मर्डर म्हणत नाही.

दिघोळेपासून ते बापू आंधळेपर्यंतचे हे मर्डर झाले आहेत. आंधळे सुध्दा तरुण सरपंच होता. त्याच्या त्याच्या गावात त्याचा चांगला जम बसला होता. त्याचा गोळीबारात मर्डर झाला.दुसरी बाजू म्हणजे महादेव मुंडेचा अजून आरोपी सापडत नसल्याचंही धस यावेळी म्हणाले.

शिवाजी वाघ हत्याप्रकरणामुळे बीडच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. गोपीनाथ मुंडे यांनी हे हत्या प्रकरण उचलून धरलं.त्या हत्याप्रकरणाशी क्षीरसागर कुटुंबियांचा संबंध जोडला.गोपीनाथ मुंडे साहेबांनी ट्विस्ट केला मोर्चा काढला.त्यावेळी तो बीडमधला सगळ्यात मोठा मोर्चा होता.त्याआधीही मुंडेंनी बीडच्या राजकारणासाठी प्रयत्न केले होते.पण शिवाजी हत्या प्रकरणामुळे गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाला बीड जिल्ह्यात लोकमान्यता मिळाल्याचं दावाही धस यांनी यावेळी केला.

संतोष देशमुखचं प्रकरण कोणी कितीही इझी घेत असलं,तरी ते इतकं इझी नाही.कारण बीड जिल्हा राजकीयदृष्ट्या चाणाक्ष, हुशार आहे.कुणाला कधी निवडून द्यायचं ,कुणाचं कुपाट लावायचं हे बीड जिल्ह्याला चांगलंच माहिती आहे.ज्याला डोक्यावर घेतेत त्याला पाय खालीही घेतेत.आणि ज्याला पायाखाली घेतेत त्याला पुन्हा डोक्यावरही घेतात,असंही धस यावेळी म्हणाले.

या दोन घटनांमध्ये धनंजय मुंडेंचं हाताखालच्या लोकांना आवरणं काम होतं,पण त्यांनी ते आवरलं नाही. त्यामुळे ही मंडळी बीड जिल्ह्याचे बाप म्हणून लागले. 2019 पासून त्यांनी अगदी नंगानाच केला. त्यांना पूर्ण 5 वर्षे मिळाले. पुन्हा तेच मंत्री होणार होते. आम्हांला पालकमंत्री पद भेटू नये म्हणून आमचं हे सुरूय असं ते म्हणत होते.पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री किंवा वरिष्ठ पातळीवरचा होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT