Beed News : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मोर्चे व आंदोलन करीत भाजप आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवला. दरम्यान, आमदार धस यांनी सरकारनामा युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे, परळीतील गुन्हेगारी, खोक्यासह बीडच्या दहशतीवर भाष्य केले. या दरम्यान, त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्याचवेळी त्यांनी बीडच नाही तर देशभरात पोहचलेल्या 'आकाचा...आका' या शब्दाची सुरेश धसांनीच पहिल्यांदा संपूर्ण हिस्ट्री सांगितली.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. ही हत्या झाली त्यावेळी मी एका कामाच्या निमित्ताने मुंबईत होतो. नागपूर येथील अधिवेशन सुरु होणार होते. त्याच वेळी इच्छुक असलेल्या मंडळींचे मंत्रीपदासाठी लॉबिंगही सुरु होते. त्यामुळे मी मुंबईत होतो. त्या ठिकाणीच मला ही घटना समजली होती. 10 डिसेंबरपासूनच या प्रकरणात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange), खासदार बजरंग सोनवणे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केले होते.
त्याचवेळी नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यास सांगितला. त्यानंतर या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर मी मुंबईतील काम आटोपून 11 डिसेंबरला रात्री मुंबईतून तिकीट काढले अन बीडला निघालो. त्यानंतर 12 डिसेंबरला सकाळी साडेआठ वाजता बीडमध्ये पोहचलो.
त्यानंतर मी सकाळीच केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या गावी गेलो. त्यानंतर मी आल्याचे समजल्यानंतर अन्य काही गावातील नागरिक ही त्याठिकाणी जमा झाले. या जमलेल्या नागरिकांनी संपूर्ण प्रकरणच मला सांगितले. त्या ठिकाणच्या नागरिकांच्या तोंडून मी सर्व काही घटनाक्रम ऐकून घेतला. त्यानंतर मी पहिल्यांदाच त्या ठिकाणीच प्रसार माध्यमाना या प्रकरणात बाईट दिला. त्याचवेळी हे संपूर्ण प्रकरण भयंकर असल्याचे सांगितले. त्याचवेळी मी पहिल्यांदा 'आकाचा...आका' अन् 'आकाचा...आका' हा शब्द पहिल्यांदाच उच्चरला.
त्यानंतर मी लगेचच आजूबाजूच्या गावात जाऊन मी या संपूर्ण प्रकरणाची माहिती गोळा केली. सरपंच संतोष देशमुख यांचा लहान भाऊ धनंजय देशमुख खूपच शार्प आहे. त्यांनी व त्याचा मेहुणा दादासाहेब चिंचकर यांनी खूप माहिती मला दिली. त्याचवेळी हे संपूर्ण प्रकरण व या प्रकरणातील आरोपीना समोर आणल्याशिवाय शांत बसायचे नाही, असे ठरवले, असेही धस यांनी सांगितले.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.