Marathwada Politics : भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी नुकत्याच झालेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकाल आणि या निवडणुकीत सोशल मिडियावर रिल बनवून प्रसिद्धि मिळवलेल्या दोन उमेदवारांना मिळालेल्या मतांचा चांगलाच धसका घेतला.
काबे पोट्ट्या हो.. म्हणणाऱ्या विदर्भातल्या कराळे मास्तरला आणि भूममधील पोरगा रविराज साबळेला जर पदवीधरांची वीस वीस हजार मतं पडत असतील तर आता आम्हालाही विचार करावा लागेल, असा चिमटा धस यांनी आपल्या भाषणात काढला. आष्टी मतदारसंघातील एका गावात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या लोकार्पणासाठी आलेल्या धस यांनी आपल्या भाषणात चांगलीच फटकेबाजी केली.
आता आमच्यावरही सकाळपासून सोशल मिडियावर कधी उठलो, कुठे गेलो, काय खाल्लं? हे सांगण्याची वेळ येते की काय? असे म्हणत त्यांनी रविराज साबळे, कराळे मास्तर यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
पदवीधरांच्या निवडणुकीत जर अशा पद्धतीने रील बनवणाऱ्यांना वीस-चाळीस हजार मतं पडत असतील तर याला काय म्हणावं? पण केवळ सोशल मिडियावर पोस्ट, व्हिडिओ किंवा रील बनवून काही होत नसतं.
असं काम करावं लागतं की जे वर्षानुवर्षे स्मरणात राहील. त्याचा सर्वसामान्य लोकांना, गावकऱ्यांना फायदा होईल. आता इथे बनवलेला बंधारा कित्येक वर्ष लक्षात राहील. तुम्ही त्याची जाण ठेवताल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी गावकऱ्यांनाही चिमटा काढला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये सोशल मिडियावर झळकणाऱ्या या लोकांना एवढी मतं मिळत असतील तर उद्यापासून मलाही, मी सकाळी उठलो, चहा घेतला, आता आंघोळ करणार आहे, त्यानंतर नाश्ता करणार. मग देवाला जाऊन नारळ फोडणार, पुन्हा संध्याकाळी घरी येणार, आणि झोपणार हे टाकावे लागते की काय? अशी मिश्किल टिप्पणी धस यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.