MLA Suresh Dhas Letter News Sarkarnama
मराठवाडा

MLA Suresh Dhas News : माझ्या पत्रामुळेच उज्वल निकम यांची नियुक्ती, आता आरोपी फासावर जाणारच!

Suresh Dhas claims that the appointment of Ujwal Nikam as the prosecutor in the Santosh Deshmukh case was made due to his letter. : 18 डिसेंबर 2024 रोजी आमदार सुरेश धस यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले होते.

Jagdish Pansare

Sarpanch Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. लवकरच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईल. आपल्या मागणीवरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख प्रकरणात विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याचा दावा भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी मी केली होती. या मागणीला यश आलं असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उज्वलजी निकम आणि अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे देशमुख कुटुंबियांना मोठा धीर मिळाला असून संतोष देशमुख यांना लवकरच न्याय मिळेल. अन्यायाविरुद्धचा आपला हा लढा सुरूच राहणार आहे. आरोपींना लवकरच शिक्षा होईल. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो, अशा शब्दात सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

18 डिसेंबर 2024 रोजी आमदार सुरेश धस यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले होते. बीड जिल्ह्यातील मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील लोकनियुक्त सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची क्रूर हत्या झाली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे.

तसेच याप्रकरणी माननीय विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची आणि पीडित परिवाराला कायदेशीर मदतीसाठी सहाय्यक म्हणून स्थानिक वकील एडवोकेट बी.डी. कोल्हे यांची नियुक्ती व्हावी यासाठी आवश्यक कार्यवाहीचे संबंधितांना आदेश द्यावेत अशी विनंती आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली होती. आज साडेतीन महिन्यांनी धस यांची ही मागणी पूर्ण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT