Suresh Dhas News : 'देवाभाऊ'चा आश्वासक चेहरा होता म्हणून घड्याळ अन् धनुष्यबाणाला आमची मतं!

MLA Suresh Dhas claims that Devendra Fadnavis' efforts led to Shiv Sena and NCP gaining votes in the recent elections : देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांनी घड्याळाला मतं दिली. नाहीतर भाजपाने घडळ्याला कधी मतं दिली असती का? असा सवालही धस यांनी यावेळी उपस्थितीत केला.
Suresh Dhas-CM Fadnavis News
Suresh Dhas-CM Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : राज्यभरात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी राज्यातील महायुती सरकार सत्तेवर येण्याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.देवाभाऊंचा आश्वासक चेहरा पाहूनच मतदारांनी महायुतीला मतदान केले. एवढेच नाही तर आमच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही फडणवीस यांच्यामुळेच यश मिळाले, असा दावा धस यांनी केला.

धाराशीव जिल्ह्यातील परांडा येथे एका कार्यक्रमात सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देणारा नेता म्हणजे देवाभाऊ, असा उल्लेख केला.2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांच्याकडे पाहूनच राज्यातील मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केले.

आतापर्यंतच्या इतिहासात एवढे आमदार कधी कोणत्या युतीचे निवडून आले होते का? महायुतीने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासारखा स्वच्छ आणि आश्वासक चेहरा दिला म्हणून लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभेत एवढे मोठे यश मिळाले. केवळ भाजपाच नाही तर मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही याचा फायदा झाला.

Suresh Dhas-CM Fadnavis News
Suresh Dhas : सुरेश धस यांचा वेगळाच प्लॅन, भरसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 'या' नेत्याचे तोंडभरून कौतुक

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांनी घड्याळाला मतं दिली. नाहीतर भाजपाने घडळ्याला कधी मतं दिली असती का? असा सवालही धस यांनी यावेळी उपस्थितीत केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी आमची जुनी मैत्री आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देणारा नेता म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते, असेही धस म्हणाले.

Suresh Dhas-CM Fadnavis News
Devendra Fadanvis : '..तर माझं नाव देवेंद्र फडणवीस सांगणार नाही', फडणवीसांची दिल्लीतून गर्जना

दरम्यान, आयोजकांकडून सुरेश धस यांचा सत्कार केला जात होता, मात्र धस यांनी तो नाकारला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही, देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत कुठलाच सत्कार स्वीकारणार नाही, असे सांगत धस यांनी सत्कार नाकारला. धस यांनी सत्काराला नकार दिल्यानंतर व्यासपीठावरील इतरांनीही सत्कारास नकार दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com