Beed Sarpanch Case New CCTV : बीड सरपंच हत्या प्रकरणात मोठी धक्कादायक अपडेट, संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा 'तो' व्हिडिओ समोर

Santosh Deshmukh Murder Case Update : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने उलटून गेले आहेत. या प्रकरणी 'मकोका' लावण्यात आलेले वाल्मिक कराड याच्यासह आठ जण अटकेत आहेत.
Santosh Deshmukh 6
Santosh Deshmukh 6Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने उलटून गेले आहेत. या प्रकरणी 'मकोका'लावण्यात आलेले वाल्मिक कराड याच्यासह आठ जण अटकेत आहेत. पण देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तीन-तीन तपास यंत्रणा अॅक्शन मोडवर असूनही अद्याप हत्येतील कृष्णा आंधळे अजून 'वाँटेड'आहे. त्याचा शोध लागत नसल्यावरून राजकीय नेत्यांकडून गंभीर आरोप केले जात आहे. आता या प्रकरणात मोठी धक्कादायक अपडेट समोर आली आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर येत आहे. संतोष देशमुख यांचे आरोपींनी अपहरण केले होते.अपहरणानंतर त्यांना मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आली .सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुन्हा एक CCTV समोर आला आहे. सर्व आरोपी एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये बसून आल्याचे या नव्याने समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील वाशीमधून काही क्षणात हे 6 आरोपी एकापाठोपाठ एक ती गाडी सोडन पळताना दिसत आहे.

बीड सरपंच हत्येप्रकरणाला दोन महिने पूर्ण झाल्यानंतरही अजून आरोपींवर कारवाई झालेली नाही. याशिवाय आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. देशमुख यांना मारहाण होताना आरोपींकडून व्हिडिओ कॉलदेखील करण्यात आला होता. पण हा व्हिडिओ कॉल कोणा एका व्यक्तीला नव्हे तर मोक्कार पंती नावाच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रतीक घुलेने केला होता.हा व्हिडिओ कॉल 17 ते 19 वर्ष वयोगटातील 6 जणांनी पाहिल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Santosh Deshmukh 6
Jayant Patil: भाजप प्रवेशाच्या जोरदार चर्चा; जयंत पाटलांचं ठरवून 'नो कमेंटस्'?

या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विष्णु चाटे याचा मोबाईल मात्र अद्याप 'सीआयडी'ला सापडलेला नाही. चाटेचा मोबाईल पोलिसांच्या तपासात अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. चाटे याच्या फोनवरुनच वाल्मिक कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलला होता.त्यावरुन त्याने 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. तेव्हाच त्याने हातपाय तोडण्याची धमकीदेखील दिल्याचे पोलिसांना ऑडिओ क्लिप सापडल्याची सूत्रांची माहिती आहे.

केज तालुक्यातील अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पात खंडणी मागण्यासाठी गेलेल्या सुदर्शन घुलेनं तिथल्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. तसेच भांडण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या सरपंच संतोष देशमुख आणि आरोपींमधला वाद टोकाला पोहचला.त्यानंतर खंडणी मागणाऱ्या आरोपींना मारहाण करण्यात आली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Santosh Deshmukh 6
Rushiraj Sawant case update : सस्पेन्स संपला; ऋषिराज सावंत प्रकरणात आता मोठी अपडेट; पोलिसांनी दिली 'ही' माहिती

आरोपी सुदर्शन घुले याला वाढदिवसादिवशीच मारहाण झाली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा राग मनात ठेवून प्रतिक घुले याने संतोष देशमुख यांचे अपहरण केले. अपहरणानंतर आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांकडून फायटर,गॅस पाईप आणि काठीने संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली. जयराम चाटे याने व्हॉट्सअॅपवर मोक्कारपंती ग्रुपवर व्हिडिओ कॉलकरुन मारहाणीचा आणि त्याच्या अगोदरचा व्हिडिओदेखील दाखवल्याचे पोलिस तपासात समोर आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com